अमरावती : जिल्ह्यात चार महिन्यांत कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला तसाच माघारला. मात्र, या कालावधीत संक्रमणमुक्त नागरिकांचा टक्काही वाढल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. सद्यस्थितीत ९१ हजार ७२२ व्यक्ती संक्रमणमुक्त झाल्या आहेत. हा टक्का उच्चांकी ९६.४९ आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ७०,४६९ संक्रमितांची नोंद झाली, तर याच कालावधीत ७० हजार ५०५ रुग्ण संक्रमणमुक्तही झाले आहेत. सर्वाधिक २८,८०१ संक्रमणमुक्त नागरिकांची मे महिन्यात नोंद झाली आहे. दुसऱ्या लाटेच्या ‘पिक’मध्ये सक्रिय रुग्णांचा आकडा आठ हजारांपर्यंत पोहोचला होता. तो आता १,८१३ वर असल्याने कोरोना हॉस्पिटल आता ओस पडू लागल्याची सुखद वार्ता आहे.
जिल्ह्यात पहिल्या कोरोना संक्रमितांची नोंद ४ एप्रिल २०२० झाली होती व त्याचे हायरिस्कमधील पाच व्यक्ती २१ एप्रिल रोजी डिस्चार्ज झाल्या होत्या. तेव्हापासून ते आतापर्यंत तब्बल ९१ हजार ७२२ नागरिक संक्रमणमुक्त झाले आहेत. दुसऱ्या लाटेत संक्रमणमुक्तीचा टक्का माघारला होता. ८५ टक्क्यांपर्यंत जिल्ह्याची स्थिती आलेली होती. त्यावेळी सक्रिय रुग्णांची संख्यावाढ व रोज नोंद होणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने ही स्थिती ओढावली होती. परंतु, जिल्हा आता या संकटातून सावरला आहे.
पाॅईंटर
यंदाची स्थिती
जानेवारी : २,१९६
फेब्रुवारी : ३,३१६
मार्च : १५,३८२
एप्रिल : १२,६८३
मे : २८,८६१
१३ जून : ५,२६५
बॉक्स
सातव्या दिवशी डिस्चार्ज
जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात १५ दिवसांनंतर सलग दोन टेस्ट निगेटिव्ह आल्यासच रुग्णांना डिस्चार्ज दिला जात होता. त्यानंतर दहाव्या दिवशी डिस्चार्ज दिला जात असे. आता रुग्णसंख्या वा