कोरोना; २३ मृत्यू, ७३९ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:14 AM2021-04-23T04:14:36+5:302021-04-23T04:14:36+5:30
अमरावती : वाढत्या संसर्गात कोरोना बाधितांच्या मृत्यूमुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे. गुरुवारी तब्बल २३ कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये ...
अमरावती : वाढत्या संसर्गात कोरोना बाधितांच्या मृत्यूमुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे. गुरुवारी तब्बल २३ कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये जिल्ह्यातील १६ तर अन्य जिल्ह्यातील सात रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात बाधितांच्या मृत्यूंची संख्या ८२९ झालेली आहे. याशिवाय गुरुवारी नव्या ७३९ पॉझिटिव्हची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ५९,१२४ झालेली आहे.
जिल्ह्यात तीन आठवड्यानंतर उच्चांकी ६,११२ नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यामध्ये १२.०९ टक्के पॉझिटिव्हिटी नोंद झाली. दोन ्िदिवसांत नमुन्यांमध्ये पॉझिटिव्हिटीचे प्रमाण कमी होत असल्याने जिल्ह्यास काहीसा दिलासा मिळाला आहे. महापालिका क्षेत्रातील संसर्गात काही प्रमाणात कमी आलेली असताना जिल्हा ग्रामीणमध्ये मात्र कोरोना संसर्गाने उचल खाल्ल्याचे दिसून येत आहे. यासाठी उपाययोजना आखल्या असल्या तरी त्यांची अंमलबजावणी मात्र, पुरेसी होताना दिसत नाही. लग्नसोहळा, अंत्ययात्रा यावेळी सध्याही शासन नियमांना बगल दिला जात असल्याची कित्येक उदाहरणे आहेत.
शहरातील रस्त्यांवर विनाकरण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा प्रकार पाचही झोनमध्ये होत असल्याने आता कुठे गर्दी कमी व्हायला लागली. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आदेशाचे सकारात्मक परिणाम आता दिसायला लागले आहेत.
बॉक्स
जिल्ह्यात २४ तासांतील कोरोना मृत्यू
(पाच ओळीची जागा सोडावी)
बॉक्स
नागपूर, वर्धा, एमपीमधील सात रुग्णांचा मृत्यू
(तीन ओळी जागा सोडावी)