अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग, रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढतीच आहे. सोमवारी पुन्हा २४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या १,०४९ वर पोहोचली आहे. याशिवाय अन्य जिल्ह्यातील तीन रुग्णांचा मृत्यू देखील झालेला आहे. बुधवारी पुन्हा उच्चांकी १,१६७ पॉझिटिव्हची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ७०,६९४ वर पोहोचली आहे.
जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोनाचा संसर्ग व चाचण्यांमध्ये पाॅझिटिव्हिटी वाढतीच असल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. मंगळवारी महापालिका क्षेत्रात १३ टक्के, तर ग्रामीणमध्ये ८७ टक्के रुग्णसंख्या नोंदविण्यात आलेली आहे. बुधवारी देखील याच प्रमाणात रुग्णसंख्येची नोंद झाली. ग्रामीणमध्ये रोज रुग्णसंख्या वाढत असल्याने आता तालुका ठिकाणी कोरोना हेल्थ सेंटर व मोठ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना केअर सेंटर सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी काही पीएचसींना भेटी दिल्या आहेत.
बॉक्स
वाढत्या पाॅझिटिव्हिटीने वाढविली चिंता
जिल्ह्यात बुधवारी ३,७०४ चाचण्या करण्यात आल्या. यात ११६७ रुग्णांची नोंद झाली. ही पॉझिटिव्हिटी ३१.५० टक्के असल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. तसे पाहता चार दिवसांत हे प्रमाण वाढतेच आहे. १ तारखेला २६.५३ टक्के, २ तारखेला २२.२७ टक्के, ३ तारखेला २६.५२ टक्के तर ४ एप्रिलला २७.९१ टक्के पॉझिटिव्हिटी नोंद करण्यात आलेली आहे.
बॉक्स
बुधवारी जिल्ह्यातील २७, अन्य जिल्ह्यातील तिघांचा मृत्यू
उपचारादरम्यान येथील ५० वर्षीय महिला, साईनगर, ६० वर्षीय पुरुष आणि ५६ वर्षीय महिला, राहटगाव, ८७ वर्षीय पुरुष, ६४ वर्षीय महिला, कॅम्प नवी वस्ती, बडनेरा, ६५ वर्षीय पुरुष, छांगाणीनगर याशिवाय ३७ वर्षीय पुरुष, सावनेर, वरुड, ५९ वर्षीय पुरुष, पथ्रोट, ४५, वर्षीय पुरुष, शेंदूरजना बाजार, ५६ वर्षीय पुरुष, चांदूर रेल्वेतील ८० वर्षीय पुरुष, मार्डी, ६२ वर्षीय पुरुष, चिखलदरा, ६५ वर्षीय महिला, कारंजा लाड, ५४ वर्षीय पुरुष, कुऱ्हा, ६५ वर्षीय महिला, सावळा, ५५ वर्षीय पुरुष, मोर्शी, ८४ वर्षीय पुरुष, चांदूर रेल्वे, ३५ वर्षीय पुरुष, माणिकपूर, बेनोडा, ५५ वर्षीय पुरुष, चांदूर बाजार, ८५ वर्षीय पुरुष, वरूड, ६४ वर्षीय पुरुष, मूर्तिजापूर, ५२ वर्षीय पुरुष, बाभूळगाव, ४५ वर्षीय पुरुष, बोरेदा व ३० वर्षीय पुरुष, धामणगाव रेल्वे तसेच अन्य जिल्ह्यातील ६० वर्षीय पुरुष, कारंजा घाडगे, वर्धा ७५ वर्षीय पुरुष, पिंपरी कारंजा, वाशीम व ५८ वर्षीय महिला, नरसापूर, आष्टी, वर्धा या रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.