पॅनिक नको, मात्र सजगतेची गरज
सब हेडिंग : किडनी रुग्णांची डायलिसीससाठी ससेहोलपट : मूत्यूही अधिक
असाईनमेंट
प्रदीप भाकरे
अमरावती : मूत्रावाटे शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर टाकण्याचे कार्य मूत्रपिंड अर्थात किडनी करते. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मूत्रपिंडाचे हे कार्य योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते. परंतु, योग्य काळजी घेतली नाही, तर मूत्रपिंडाचे विकार जडतात आणि जीवन त्रासदायक होऊन बसते. किडनीचा आजार असलेल्याला कोरोना संक्रमण झाल्यास ते अधिकच नुकसानदायी ठरत असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले आहे.
कोरोना होऊन गेल्यानंतर तो केवळ फुफ्फुसांवर परिणाम करून जातोे, असे नाही, तर तो आता सौम्य समस्या असलेल्या रुग्णाच्या मूत्रपिंडावर विपरीत परिणाम करत असल्याचे समोर आले आहे. कोविड विषाणूचा संसर्ग होण्यापूर्वी मूत्रपिंडाचा सौम्य आजार असलेल्या रुग्णाचे कोविडमधून बरे झाल्यानंतर मूत्रपिंडाचे कायमचे नुकसान होत असल्याची चिंताजनक बाब तज्ज्ञ डॉक्टरांच्या निदर्शनास आली आहे.
अमरावती येथील दोन किडनी तज्ज्ञांकडे उपचार घेणाऱ्या ज्या किडनी रुग्णांना कोरोनाची बाधा झाली, त्यांच्यापैकी ५० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे. कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार करीत असताना किडनीच्या ट्रीटमेंटवर दुर्दैवाने फोकसच करण्यात आला नाही, असे निरीक्षण किडनीतज्ज्ञांनी नोंदविले आहे.
-----------------
कोरोनाचे एकूण रुग्ण :
बरे झालेले रुग्ण :
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण :
एकूण मृत्यू
दुसऱ्या लाटेतील मृत्यू : १०४३
--------------
किडनीचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास
१) घाबरायचे नाही, मात्र कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरला तुमची किडनी हिस्ट्री सांगा.
२) ज्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार असाल, तेथे ऑक्सिजन, आयसीयू याव्यतिरिक्त डायलिसीसची सुविधा आहे की नाही, ते आधी माहीत करून घ्या.
३) त्यानंतरच आपल्या रुग्णाला त्या कोविड हॉस्पिटलला हलवा.
बॉक्स
स्टेरॉईड कन्सल्टंट ठरवेल
आधीच्या लाटेत प्रचंड प्रमाणात स्टेरॉईड देण्यात आले. त्यामुळे आता स्टेरॉईड द्यायचे की नाही, ते फॅमिली डॉक्टरला नव्हे, तर कोविडवर उपचार करणाऱ्या कन्सल्टंटला ठरवू द्या. आधी किती दिले, रुग्णाचा किडनी आजार नेमक्या कोणत्या पातळीवर आहे, हे रुग्ण सांगू शकणार नसेल, तर कन्सल्टंटनेच त्या रुग्णांच्या किडनी आजारावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी बोलून स्टेरॉईड द्यायचे की कसे, ठरवू द्या.
----------------
कोट
किडनी रुग्ण कोविडबाधित झाल्यास, संबंधितांनी अधिकच सजग, सतर्क राहायला हवे. रुग्णाने कोविडवर उपचार घेत असतानाही डायलिसीस चुकवू नये. अन्य रुग्णांच्या तुलनेत किडनी रुग्णाला कोरोना होणे ही अधिक चिंतेची बाब आहे.
डॉ. अविनाश चौधरी (डीएम), किडनीतज्ज्ञ, अमरावती.
---------------------
हे करा
* किडनी रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यास सर्वप्रथम ज्या डॉक्टरकडे किडनीवरील उपचार सुरू आहेत, त्यांना सांगा.
* ज्या कोविड रुग्णालयात डायलिसीसची सुविधा आहे, तेथे उपचारासाठी दाखल व्हा.
*घाबरू नका, मात्र अन्य आजार असलेल्यांच्या तुलनेत अधिक सजग राहा.
---------
हे करू नका
*बापरे, मी कोरोना पॉझिटिव्ह आलोय, असे म्हणून पॅनिक होऊ नका.
* किडनीतज्ज्ञासह कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून किडनी आजाराबाबत कुठलीही गोष्ट लपवू नका.
*कुठल्याही परिस्थितीत डायलिसीस चुकवू नका.
-------------