संसर्गाचा वेग मंदावला, वेळेत तपासणीचा परिणाम
अमरावती : दोन महिन्यांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या घटली आहे. सद्यस्थितीत केवळ १८७ रुग्ण उपचार घेत आहेत. चिखलदरा तालुक्यात कोरोनाचा ग्राफ नगण्य आहे. उर्वरित १३ तालुक्यांत काही ना काही रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यात १७ जानेवारीपर्यंत १ लाख ६७ हजार ८२९ नागरिकांची कोरोना चाचणी झाली. २० हजार ७७० पॉझिटिव्ह आढळून आले. यापैकी १९ हजार ९९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात बाधित रुग्णांचे प्रमाण सात टक्क्यांवर आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२७ टक्के आहे. कोरोना मृत्यूचे प्रमाण दोन टक्के आहे. जिल्हाभरात पूर्वीच्या तुलनेत कोरोनाग्रस्तांची संख्या घटली तरी दररोज काही प्रमाणात भर पडत आहे.एक ते दोन दिवसाआड मृत्यू होत आहेत. १७ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात ४०९ नागरिकांचा मृत्यू झाला. या मृत्यूची नोंद शासनदरबारी घेण्यात आली आहे. नागरिकांना सतर्क राहणे आवश्यक आहे.
बॉक्स
मृत्यू ४०९
उपचार घेणारे रुग्ण १८७
बरे झालेले रुग्ण
१९९९५
बॉक्स
तालुकानिहाय अॅक्टिव्ह रुग्ण
अमरावती - ०६
भातकुली - ०८
मोर्शी - ०४
वरूड - २३
अंजनगाव सुर्जी - १७
अचलपूर - १६
चांदूर रेल्वे - ०३
चांदूर बाजार - १६
चिखलदरा - २
धारणी - ७
दर्यापूर - ९
धामणगाव रेल्वे - २२
तिवसा -८
नांदगाव खंडेश्र्वर -१८
एक़ूण -१५९
बॉक्स
सध्या बाधित होण्याचे प्रमाण -७ टक्के
रूग्ण बरे होण्याचे प्रमाण - ९६.२७
मूत्यू दर - २ टक्के
आतापर्यत झालेल्या चाचण्या १,६७,८२९