तीन हजार ग्रामस्थांना कोरोना हेल्पलाइनची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:12 AM2021-05-15T04:12:54+5:302021-05-15T04:12:54+5:30

धामणगाव रेल्वे : माजी आमदार वीरेंद्र जगताप व प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव परीक्षित जगताप हे ...

Corona helpline assistance to three thousand villagers | तीन हजार ग्रामस्थांना कोरोना हेल्पलाइनची मदत

तीन हजार ग्रामस्थांना कोरोना हेल्पलाइनची मदत

googlenewsNext

धामणगाव रेल्वे : माजी आमदार वीरेंद्र जगताप व प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव परीक्षित जगताप हे कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी धावत असून, हेल्पलाइनच्या माध्यमातून दोन महिन्यांत तब्बल तीन हजार ग्रामस्थांना त्यांनी आरोग्य विषयक आधार दिला आहे.

ऑक्सिजनसह बेडची व्यवस्था करणे अशक्य असताना ते उपलब्ध करून देणे, विशेष म्हणजे प्लाझ्माची व्यवस्थादेखील उपलब्ध करून देत असल्याने सर्वसामान्य ग्रामस्थांनी वीरेंद्र जगताप यांचे आभार मानले.

जिल्ह्यात सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाचे रुग्ण धामणगाव विधानसभा मतदारसंघातील चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर या तालुक्यात आहे. सबब, परीक्षित जगताप यांनी कोरोना रुग्णांसाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनशी दोन महिन्यात तब्बल तीन हजार ग्रामस्थांनी संपर्क साधला. अवघ्या १० मिनिटांत कुणाला ऑक्सिजन, तर कुणाला प्लाझ्मा तर कुणाला बेड या हेल्पलाइनच्या माध्यमातून मिळाले आहेत. परीक्षित जगताप यांनी तयार केलेली ‘आपली हेल्पलाइन’ २४ तास अलर्ट केली आहे. धझ्णनगावात नितीन कनोजिया, आशिष शिंदे, ऋषिकेश जगताप, शुभम चौबे तर नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अक्षय पारसकर, फिरोज खान, निशिकांत जाधव, अमोल धवसे तसेच चांदूर रेल्वे तालुक्यातील नीलेश सूर्यवंशी, संदीप शेंडे, निवास सूर्यवंशी, रुपेश पुडके यांच्यासह काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते रोज आपापल्या गावातील रुग्णांना मदत करीत आहेत.

Web Title: Corona helpline assistance to three thousand villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.