वरूड : कोरोनाने गेल्या मार्च महिन्यापासून दुसऱ्या लाटेने पाय रोवले असून अनेकांना कोरोनाने ग्रासले आहे . तर शेकडो रुग्णाणी प्राण सुद्धा गमावले . कोरोना लॉक डाऊन मध्ये पाच महिने रोजगार नव्हता तर बेरोजगारीचे संकट डोक्यावर असल्याने आर्थिक अडचणीसह उपासमारीला तोंड द्यावं लागले .यामुळे कर्जदारांना कोविद मध्ये किस्त भरण्यास सूट द्यावी, अशी मागणी केल्या जात आहे तर कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव असल्याने उद्योग धंदे अर्धवट सुरु झाले. यामुळे कर्जाचा भरणा करण्यास अडचणी निर्माण होत आहे. मात्र खासगी फायनान्स कंपन्यांची अरेरावी वाढून कोरोनाकाळातील व्याजाची रक्कम वसूल करण्याचा सपाटा सुरू असल्याने कर्जदार हवालदिल झाले आहे. कर्जावरील व्याजाची रक्कम माफ करून राज्य शासनाने खासगी कर्ज पुरवठाधारक कंपन्यांना आवर घालण्याची मागणी कर्जदार करीत आहे.
देशात कोरोना कोविड १९ च्या प्रादुर्भावाने नागरिक त्रस्त झाले आहे. नोकऱ्या, रोजगार, व्यवसाय हातून गेला. पाच महिन्यांच्या काळात दुकानाचे भाडेसुद्धा डोक्यावर चढले. या काळात उपासमारीचे जीणे जगावे लागले. अनेकांनी आत्महत्या केल्या. परंतु गत जूनपासून शिथिलता मिळाल्याने कसेबसे व्यवसाय सुरू करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहापुरते कमावण्यास सुरुवात झाली होती. या काळात शासनाने कर्जवसुली करू नये, असे सक्त आदेश होते. परंतु जूनपासून खासगी फायनान्स कंपन्यांनी कोरोना काळातीलसुद्धा व्याज आकारून ते वसुलीचा सपाटा सुरू केला होता. कंपनीच्या प्रतिनिधीला विचारले असता मोरेटीयम केले नाही का, अशी विचारणा करून कर्जदारांवर दबाबतंत्राचा वापर केला जातो. यामुळे अनेक कर्जदार निराशेच्या गर्तेत जीवन व्यतीत करीत आहे. कोरोना प्रादुर्भाव सुरूच असून आता ग्रामीण भागातील नागरिक कर्जवसुली पथकाला त्रस्त झाले आहे. अनेकांचा बळी जात असताना खासगी पतपुरवठा धारकांनी धडक वसुली सुरू करून मोबाईलवर सतत तगादा लावत असल्याने कर्जदार त्रस्त झाले आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाने आणि राज्य शासनाने तातडीने अशा कंपन्यांवर कारवाई करून डिसेंबरपर्यंत कर्जावरील व्याजात सूट देण्याची मागणी केली आहे. अन्यथा शासनाने कर्ज भरणा करावा, अशी मागणी केली आहे.