ग्रामीण भागात सर्वाधिक समारंभ, जानेवारी ते २० एप्रिलपर्यंत ३९१ नोंदणीविवाह
अमरावती : वर्षभरापासून कोरोनामुळे लग्नाच्या मुहूर्तावर विघ्न पडत आहेत. मध्यंतरी अनलॉकमध्ये ५० लोकांच्या उपस्थितीत लग्नसमारंभाला मंजुरी देण्यात आली होती. या आदेशाचा गैरफायदा घेत लग्नाचा बारच फुटला वर्षभरात शहरात व ग्रामीण भागात जवळपास चार हजारावर विवाह समारंभ पार पडले आहेत.
सुरुवातीला काहींनी प्रशासनाकडून लग्नसमारंभासाठी परवानगी घेतली. त्यांतर विना परवानगीनेच २०० ते ५०० लोकांच्या गर्दीत लग्न समारंभ दररोजच लग्न समारंभ उरकण्यात आले. ना तिथीं ना कोरोनाची भीती यात लग्न समारंभ झाल्याने यातूनच कोरोनाचा उदय झाला. जिल्ह्यात बहुतांश गावात कोरोनाचा संसर्ग पोहोचला आहे. त्या गावात या वर्षभरात लग्न झाले नसले अशा गावातील जोमाने लग्नसमारंभ पार पाडण्यात आले. डीजेच्या तालावर लग्न करण्यात आले. जिल्ह्यात जवळपास ४ हजारांवर लग्न सोहळे पार पडले असतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाची नजर चुकून लग्न सोहळा आयोजित करण्यात आले. यावेळी कोरोना नियमांचे पालनही करण्याचा प्रयत्न झाला.या लग्न समारंभातून कोरोनाचा उद्रेक होऊ लागला परिणामी आता कोरोनाने उग्र रूप धारण केले आहे.
बॉक्स
एप्रिल कठीणच!
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आता ही परिस्थिती सावरणे एप्रिल महिन्यात कठीण झाले आहे. एप्रिल महिन्यात चार एप्रिल पासून सरकारने कठोर निर्बंध लावले. त्यानंतर १५ एप्रिलपासून संचारबंदी लावली तरीही काहीजण लग्नसमारंभ करीतच आहेत.
बॉक्स
वर्षभरात ६१ लग्न तिथी
पंचांगानुसार वर्षभरात ६१ लग्नतिथी दिले आहेत. एप्रिल ते जुलै दरम्यान ३२ तर नोव्हेंबर २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान २९ लग्न तिथी आहेत. मात्र कोरोनाचा कहर सुरूच असल्याने व परवानगीची प्रक्रिया किचकट असल्याने अनेक जण लग्न सोहळा पुढे ढकलत असल्याचे दिसून येत आहे.
बॉक्स
३९१ जणांचे रजिस्टर शुभमंगल
येथील सहदुय्यम निबंधक अधिकारी कार्यालय यांच्याकडे गत वर्षभरात ८३९ जोडप्यांचे लग्न झाल्याची नोंद केली आहे.तर जानेवारी ते २० एप्रिल २०२१ पर्यत ३९१ जणांचे नोंदणी विवाह उरकले आहेत. जानेवारी ते ते १९ एप्रिल पर्यत ४६९ विवाह नोंदणीची नोटीस देण्यात आली होती. यातील काही विवाह आटोपले आहे. हा आकडा विवाह नोंदणी कार्यालयाकडील असला तरी प्रत्यक्षात लग्नसोहळ्याचा आकडा ४ हजारांमध्ये असल्याचे जाणकार सांगत आहेत. नोंदणी विवाह करण्यास ग्रामीण भागात अद्याप उदासीनता दिसून येत आहे.
कोट
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता व ५० लोकांच्या उपस्थिती विवाह करण्यास परवानगी दिली आहे.परिणामी अनेक ठिकाणी विवाह घरीच उरकविले जात आहे.कमी जागेत विवाह होत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग पाळूून मंगल कार्यालयात विवाह करण्यास परवानगी दिली तर कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होवू शकते.
नितीन देशमुख
मंगल कार्यालय संचालक
कोट
कमी लोकात लग्न करायचे असेल तर मंगल कार्यालयात का लग्न करायचे असे लोकांना वाटते. मंगल कार्यालयात थाटामाटाने लग्न न करता घरीच लग्न करण्यात आले.त्यामुळे मंगल कार्यालय सोबत या व्यवसायावर अवलंबून असलेल्या व्यक्तींचे मोठे नुकसान झाले आहे.
नितीन कदम
लॉन संचालक