पाचवी ते आठवी दरम्यानच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू, कोरोना नियमावलींचे पालन
अमरावती : शालेय शिक्षण विभागाने आता २७ जानेवारी २०२१ पासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हा परिषद, महापालिका शिक्षण विभागातील यंत्रणेने नियाेजनास सुरुवात केली आहे. शाळा सुरू होण्याच्या तीन दिवसांपूर्वी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी होणार असून, तीन टप्प्यांत नियोजन करण्यात येणार आहे.
नववी ते बारावीपर्यंतचे अध्यापन २३ नोव्हेंबरपासून सुरू झाले. शाळांमध्ये संख्या कमी असली तरी कोरोना नियमावलींचे पालन करुन नियमितपणे शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी काळजी म्हणून सर्व वर्गखोल्या, शाळा परिसरात जंतुनाशक फवारणी करून घेण्यात आली होती तसेच शिक्षकांची तालुकास्तरावर आरोग्य विभागामार्फत कोरोना चाचणी करण्यात आली हाेती. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही, यासाठी पालकांकडून संमतिपत्र भरून घेण्यात आले होते. शाळा सुरू करण्यासाठी संस्थेची परवानगी घेण्यात आली होती. हीच प्रक्रिया ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग राबविणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली.
-----------------------------
जिल्ह्यातील शाळांची संख्या
पाचवी ---------------
सहावी --------------------
सातवी ------------------
आठवी -----------------
--------------------
विद्यार्थी संख्या ---- १,५७,०२२
जिल्ह्यातील शिक्षक संख्या---९,२१८
-----------------
आरोग्य विभागाला कोरोना चाचणीसाठी देणार पत्र
पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. त्याअनुषंगाने शिक्षकांची कोरोना चाचणी करून घ्यावी लागणार आहे. शालेय शिक्षण विभागाकडून आरोग्य यंत्रणेला त्यासंबंधी पत्र दिले जाणार आहे. २३ ते २६ जानेवारी यादरम्यान तीन टप्प्यांत शिक्षकांची कोरोना चाचणीचे नियोजन करण्यात येणार आहे.
--------------
‘‘ शासन परिपत्रकानुसार कोरोना नियमावलींचे पालन करून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यात येणार आहेत. प्रत्येक शिक्षकाची कोरोना चाचणी केली जाईल. त्यांना अहवालानुसार कर्तव्य बजावावे लागणार आहे. पालकांच्या संमतिपत्राशिवाय मुलांना शाळांत प्रवेश दिला जाणार नाही.
- प्रिया देशमुख, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), अमरावती.