नांदगावात ७७३ शेतकऱ्यांकडून कापूस नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:11 AM2021-01-02T04:11:04+5:302021-01-02T04:11:04+5:30

नांदगावात खरेदी केंद्र सुरू करण्यापूर्वी ३०० शेतकऱ्यांना अमरावती येथील कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी नेण्यास सांगितले गेले. यातील १२३ ...

Cotton registration from 773 farmers in Nandgaon | नांदगावात ७७३ शेतकऱ्यांकडून कापूस नोंदणी

नांदगावात ७७३ शेतकऱ्यांकडून कापूस नोंदणी

Next

नांदगावात खरेदी केंद्र सुरू करण्यापूर्वी ३०० शेतकऱ्यांना अमरावती येथील कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी नेण्यास सांगितले गेले. यातील १२३ जणांनी अमरावती केंद्रावर कापूस विक्रीसाठीही नेला होता. पण, आता नांदगावात शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्याने अमरावती केंद्रावर कापूस न नेलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना स्थानिक केंद्रावर कापूस विक्रीसाठी बोलाविण्यात येणार आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

नांदगावात नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना अमरावती येथे कापूस विक्रीसाठी नेणे अडचणीचे ठरत होते. नांदगावात कापूस खरेदी केंद्र सुरू व्हावे, या मागणीसाठी येथील माणकचंद जैन व तालुक्यातील शेतकऱ्यांनी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्याकडे धाव घेतली होती. जगताप यांनी शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी नांदगावात कापूस खरेदी केंद्र उघडण्यात यावे, ही मागणी करीत शेतकऱ्यांच्या समस्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासमक्ष मांडल्या. पालकमंत्र्यांनी तो प्रस्ताव पणन महासंघाच्या अध्यक्षांकडे पाठविला. त्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने नांदगावात २८ डिसेंबर रोजी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले.

Web Title: Cotton registration from 773 farmers in Nandgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.