हमालपुऱ्यात चुलतभावाची चाकूने भोसकून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 05:00 AM2021-02-15T05:00:00+5:302021-02-15T05:01:02+5:30
पोलीस सूत्रांनुसार, कैलास व सुनील हे एकमेकांचे चुलतभाऊ आहेत. कैलासचे १० वर्षांपूर्वी लग्न झाले. परंतु, त्याला अपत्य नव्हती. त्याचा चुलतभाऊ सुनील अजबे याची पत्नी सोडून गेली होती. त्यामुळे त्याने चिंचफैल येथील एका मुलीशी प्रेमसंबंध जुळविले आणि तो नाशिकला राहायला गेला. काही महिन्यांपूर्वी तो हमालपुरा येथे परतला. १३ फेब्रुवारी रात्री कैलास हा सुनीलच्या घरी गेला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : क्षुल्लक कारणावरून चाकूने भोसकून चुलतभावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी हमालपुऱ्यात घडली. कैलास मोहन अजबे (३८,रा. चिचफैल) असे मृताचे नाव आहे. या खून प्रकरणात राजापेठ पोलिसांनी आरोपी सुनील माणिक अजबे (४५, रा. हमलापुरा), त्याची पत्नी व आईला अटक केली आहे.
पोलीस सूत्रांनुसार, कैलास व सुनील हे एकमेकांचे चुलतभाऊ आहेत. कैलासचे १० वर्षांपूर्वी लग्न झाले. परंतु, त्याला अपत्य नव्हती. त्याचा चुलतभाऊ सुनील अजबे याची पत्नी सोडून गेली होती. त्यामुळे त्याने चिंचफैल येथील एका मुलीशी प्रेमसंबंध जुळविले आणि तो नाशिकला राहायला गेला. काही महिन्यांपूर्वी तो हमालपुरा येथे परतला. १३ फेब्रुवारी रात्री कैलास हा सुनीलच्या घरी गेला. घरात आणलेल्या मुुलीबद्दल विचारणा करून, तिला सोबत ठेवू नको, समाजात बदनामी होत आहे, असे कैलासने सुनीलला म्हटले. नेमकी हीच बाब सुनीलला खटकली. त्याने कैलासला अपत्य नसल्याबाबत हिणवले. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाद शांत झाल्यानंतर कैलास घरी परत गेला. मात्र, रविवारी सकाळीच कैलास हा सुनीलच्या घरी गेला. बदनामी करीत असल्याचे म्हणत त्याच्याशी वाद घातला. त्यामुळे संतापलेल्या सुनीलने कैलासवर चाकुहल्ला चढविला. कैलासच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली. दोघांचा वाद बघून सुनीलच्या आईनेसुद्धा कैलासच्या डोक्यावर बत्ता मारला तसेच पत्नी असलेल्या सदर मुलीने रपट्याने मारहाण केली. बत्त्याचा घाव वर्मी लागल्याने कैलास गांगरला. त्याचवळी सुनीलने छातीत चाकू भोसकला. यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. घटनेची माहिती राजापेठ पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
घटनास्थळाला पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, ठाणेदार मनीष ठाकरे यांनी भेट दिली. आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
तिघांना अटक
पोलिसांनी या घटनेनंतर तीनही आरोपींना अटक केली. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन रक्तबांबाळ अवस्थेत पडलेल्या कैलासला तात्काळ इर्विन रुग्णालयात दाखल केले. झटापटीत सुनीलच्या डोक्यालासुद्धा जखमा झाल्याने त्यालाही दवाखान्यात नेले. याप्रकरणी सुनील अजबे, त्याची पत्नी व आईला पोलिसांनी अटक केली.