फुला पानांच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:16 AM2021-08-19T04:16:17+5:302021-08-19T04:16:17+5:30

अमरावती : श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारे संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कलाशिक्षक श्रीकांत काळबांडे ...

Creation of the national flag through flower petals | फुला पानांच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाची निर्मिती

फुला पानांच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाची निर्मिती

Next

अमरावती : श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारे संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कलाशिक्षक श्रीकांत काळबांडे यांनी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने २० बाय ३० फूट लांबीचा भारतीय राष्ट्रध्वज पानाफुलांच्या माध्यमातून साकारला. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव पी.आर.एस. राव यांनी केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आशिष देशमुख होते. संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष कमलताई गवई, अध्यक्ष कीर्ती अर्जुन, शाळा निरीक्षक नीलेश देशमुख यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाकरिता विद्यार्थी वैभव चुटे, कुलसुम लांगे, नंदिनी मंडले, कृष्ण बुंदिले, चेतन शिंगाडे, प्रीतम, शेख रेहान, शाम पवार, भाग्यश्री मेश्राम, साईश चाफळकर, साहिल चापले, उमेर कुरेशी, आशिष पिटेकर, दिशा लांगे, शिक्षक निरंजन इंगळे, संजय दरवई, राजेंद्र खटे, प्रतिभा गवळी, विनोद राठोड, नरेंद्र जामदार, पवन गावंडे, शिल्पा खोंडे, अमोल उमाळे, निखिल घोडेराव, कर्मचारी जितेंद्र वानखेडे, भानुदास पाटील, तुषार नाईक यांनी परिश्रम घेतले. संचालन व आभार प्रदर्शन अमोल उमाळे यांनी केले.

Web Title: Creation of the national flag through flower petals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.