भाजपा प्रदेश प्रवक्त्यासह गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:15 AM2021-09-23T04:15:15+5:302021-09-23T04:15:15+5:30
प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, सचिन संभे, पवन तायडे, बालवीर गणेश मंडळाचे कार्यकर्ते रोशन शिरभाते, शुभम सातपुते, श्रीयोग दातीर, तेजस ...
प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, सचिन संभे, पवन तायडे, बालवीर गणेश मंडळाचे कार्यकर्ते रोशन शिरभाते, शुभम सातपुते, श्रीयोग दातीर, तेजस दातीर, राहुल भोगे, नितीन भोगे यांच्यासह ३० ते ३५ कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले. गणेश विसर्जनाच्या दिवशी बारीपुरा चौकात शासनाची परवानगी नसतानासुद्धा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशाच्या निनादात मिरवणूक काढल्याने पोलिसांनी कलम १८८, २६९, २७० सहकलम २, ३, ४ साथरोग प्रतिबंधक कायदा १३५ मपोका सहकलम ३ अशा प्रकारचे गुन्हे पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांच्या फिर्यादीवरून दाखल केले. गणेश विसर्जनाच्या दिवशी बारीपुरा चौकात प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांच्यासह गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांशी शाब्दिक वाद चांगलाच चर्चेत आला होता.