लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने मास्कचा वापर व दक्षतेबाबत जोरदार मोहीम हाती घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवाल यांनी महापालिका व आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. त्यानुसार जनजागृतीसाठी सोमवारपासून मोहीम राबविण्यात येणार आहे. होम आयसोलेशन तसेच खासगी दवाखाने, शासकीय रुग्णालयांनी लक्षणे असलेले व लक्षणे नसलेले रुग्ण गृह विलगीकरणामध्ये ठेवत असताना मोबाईल क्रमांक, पत्ता घेणे व रुग्णांची नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. त्यांना घराबाहेर न निघणे, मास्क वापरणे, नियमितपणे डॉक्टरांच्या संपर्कात राहणे आदी सूचना देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी केले आहे. होम आयसोलेशनमधील रुग्णांचे नोंदणी ‘होमआयसोलेशन अमरावती’ या संकेत स्थळावर करावी. हे संकेत स्थळ मोबाईल द्वारे नियंत्रित करता येते, होम आयसोलेशनमधील रुग्ण, गृह विलगीकरणाचे नियम पाळत नसल्यास रुग्णांविरुद्ध रोग प्रसार व नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई करण्यात येईल तसेच रुग्णांनी स्वत:पासून इतरांना कोरोनाची लागण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
डॉक्टरांचे संपर्क क्रमांक बंधनकारकसर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांची संपूर्ण नोंदणी करणे आवश्यक आहे, जेणेकरून रुग्ण कुठे आहे, याची माहिती होईल. ७०३०९२२८५१, ७०३०९२२८५१ मोबाईल क्रमांकांवर नोंदणी करू शकणार आहे. रुग्णांचे मोबाईल क्रमांक घेणे आवश्यक आहे, जेणेकरून रुग्णांशी व्हिडिओ कॉल, फोन कॉल करणे शक्य होईल, असे आवाहनही करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी टोचून घेतली लसजिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी पीडीएमसीला भेट देऊन पाहणी केली व स्वत: कक्षात जाऊन नोंदणी केल्यानंतर संपूर्ण प्रक्रियेतून जात लस घेतली. जिल्हाधिकाऱ्यांना कोविशिल्ड लस देण्यात आल्याचे डॉ. नांदूरकर यांनी सांगितले.