शेतकऱ्यांना पीकविमा, नांदगावात राष्ट्रवादीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:13 AM2021-05-06T04:13:40+5:302021-05-06T04:13:40+5:30
पान ४ नांदगाव खंडेश्वर : खरीप हंगाम २०२०-२१ मधील पीक नुकसानामुळे शेतकऱ्यांना विमा भरपाईची रक्कम देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक ...
पान ४
नांदगाव खंडेश्वर : खरीप हंगाम २०२०-२१ मधील पीक नुकसानामुळे शेतकऱ्यांना विमा भरपाईची रक्कम देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मंगळवारी तहसीलदारांकडे केली.
खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये सोयाबीन, मूग व उडीद ऐन पीक काढणीच्या हंगामात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे तालुक्यातील सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उत्पादन घटले. याबाबत तांत्रिक आणेवारी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून लक्षात घेऊन तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२०-२१ यावर्षीचा पीकविमा काढला, त्या सर्व शेतकऱ्यांना पीकविमा लागू करावा, ही मागणी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज गावंडे यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करताना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष सूरज बेलसरे, राजेश्वर भेंडे, सूरज कुमरे, वासुदेव गावंडे, ऋषी गिरी, मयूर मुरादे, ऋतिक गावंडे ही मंडळी उपस्थित होती.