लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवाळीनंतर आता शाळा, महाविद्यालयांच्या सुट्या संपल्यामुळे अनेक जण परतीच्या प्रवासाला लागले आहेत. परिणामी मेल, एक्स्प्रेस व पॅसेंजर अशा सर्वच गाड्यांमध्ये चिक्कार गर्दी आहे. मागील आठवड्यापासून अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकावर सामान्य तिकीट विक्रीतून दरदिवशी ६ ते १० लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत असल्याची माहिती आहे.मुंबई, पुणे, नागपूर, जबलपूर, दिल्ली, सुरत, चेन्नई, अहमदाबाद, हावडा अशा प्रमुख शहरांकडे जाण्यासाठी रेल्वे प्रवाशांनी पसंती दर्शविल्याचे आरक्षण अथवा तिकीट विक्रीच्या आकडेवारीवरून निदर्शनास आले. दिवाळीनंतर 'रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल' असे आरक्षण खिडक्यांवर फलक झळकत आहेत. अशातच रेल्वे गाड्यांच्या आरक्षणासाठी दलालांनी वेगळा मार्ग अवलबंवल्याचे वास्तव आहे. मात्र, दरदिवशी रेल्वे गाड्यांच्या तिकीट विक्रीने उच्चांक गाठल्याचे चित्र आहे. विशेषत: पुणे, मुंबईमार्गे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या तिकीटविक्रीत वाढ झाल्याची माहिती आहे. रविवार, ३ नोव्हेंबर रोजी बडनेरा रेल्वे स्थानकावर ७५०० तिकिटांची विक्री झाल्याची नोंद आहे. यात एकूण ९ हजार प्रवाशांनी रेल्वेने प्रवास केला. ८.२५ लाख रुपयांच्या तिकीट विक्रीतून उत्पन्न मिळाले. अमरावती रेल्वे स्थानकावर याच दिवशी ३३०० तिकिटांची विक्री झाली. यात सुमारे ४ हजार प्रवाशांनी प्रवास केला असून, ४.३३ लाखांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले आहे. या उत्पन्नात सामान्य तिकीट विक्रीचा समावेश असून नियमित प्रवाशांपेक्षा आजमितीला दुप्पट, तिप्पट प्रवासीसंख्या वाढली आहे. एरव्ही अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकावर दररोज २ ते २.२५ लाखांपर्यंत तिकीटविक्री होत असल्याची माहिती आहे.अलीकडे रेल्वे गाड्यांत दिवाळीनंतर गर्दी वाढली आहे. आरक्षण आणि सामान्य तिकीट विक्रीने उच्चांक गाठला आहे. अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकावर दरदिवशी ६ ते १० लाख रुपयांपर्यंत तिकीटविक्री होत आहे.- शरद सयाम,मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक, बडनेरा.
रेल्वे गाड्यांमध्ये चिक्क्कार गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 1:41 AM
मुंबई, पुणे, नागपूर, जबलपूर, दिल्ली, सुरत, चेन्नई, अहमदाबाद, हावडा अशा प्रमुख शहरांकडे जाण्यासाठी रेल्वे प्रवाशांनी पसंती दर्शविल्याचे आरक्षण अथवा तिकीट विक्रीच्या आकडेवारीवरून निदर्शनास आले. दिवाळीनंतर 'रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल' असे आरक्षण खिडक्यांवर फलक झळकत आहेत.
ठळक मुद्देमेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर हाऊसफुल्ल : अमरावती, बडनेरा स्थानकावर रोज ६ ते १० लाखांची तिकीट विक्री