जिल्ह्यात पुन्हा १६ ते २२ मे दरम्यान संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:12 AM2021-05-15T04:12:49+5:302021-05-15T04:12:49+5:30

अमरावती: राज्य शासनाने १ जून पर्यत संचारबंदीचे आदेश जारी केले आहे. मात्र, कोरोना संसर्गाची स्थिती बघता अमरावती जिल्ह्याकरिता पुन्हा ...

Curfew again in the district from May 16 to 22 | जिल्ह्यात पुन्हा १६ ते २२ मे दरम्यान संचारबंदी

जिल्ह्यात पुन्हा १६ ते २२ मे दरम्यान संचारबंदी

Next

अमरावती: राज्य शासनाने १ जून पर्यत संचारबंदीचे आदेश जारी केले आहे. मात्र, कोरोना संसर्गाची स्थिती बघता अमरावती जिल्ह्याकरिता पुन्हा १६ ते २२ मे रोजी रात्री १२ वाजता या कालावधीत कठोर निर्बंधासह संचारबंदीचे आदेश जिल्हधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवारी जारी केले आहे. यात जवळपास पूर्वीचेच निर्बंध कायम असून, कृषी उत्पन्न बाजार समिती, भाजी मार्केट, आठवडी बाजार बंद राहतील, हे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात ९ ते १५ मे दरम्यान संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले होते. मात्र, ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून, रूग्णांचे मृत्यू मोठ्या प्रमाणात होत आहे. नव्या आदेशात किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, पिठाची गिरणी आदी दुकाने, तसेच खाद्यपदार्थाची दुकाने बंद राहतील. मात्र, सकाळी ७ ते ११ या कालावधीत घरपोच सेवा सुरु राहील. ग्राहकांना दुकानात जाऊन वस्तू, साहित्य खरेदी करता येणार नाही. कृषी अवजारे व उत्पादनाशी निगडीत संब्ंधित दुकाने बंद असतील. दूध संकलन केंद्र व दूध घरपोच सेवा सकाळी ७ ते ११ या वेळेत करता येणार आहे. लग्न समारंभात १५ लोकांना परवानगी असेल.

------------------

घरपोच पार्सल सेवा

हाॅटेल, रेस्टॉरंट, खानावळ, शिवभोजन थाळी यांची सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजता दरम्यान घरपोच सेवा सुरु असेल.

-----------------

अत्यावश्यक वाहनांना मुभा

अत्यावश्यक सेवेतील सार्वजनिक अथवा खासगी वाहनांना परवानगी राहील. ओळखपत्र अनिवार्य असेल. तसेच रूग्ण वाहतूक, माल वाहतूक करणाऱ्या वाहने, शासकीय वाहनांना परवानगीची गरज नाही. पेट्रोल पंपावर अत्यावश्यक सेवेतील वाहन चालकांना ईंधन मिळणार आहे. ट्रॅक्टर, टॅंकरचा देखील समावेश करण्यात आला आहे.

----------------

हे राहील सुरू

खासगी, शासकीय रूग्णालयातील सेवा नियमित वेळेत सुरू राहतील. मेडिकल, दवाखाने, ऑनलाईन औषधी सेवा सुरू राहील. ऑनलाईन शिकवणी आणि परीक्षा घेण्यास प्रतिबंध राहणार नाही. बॅंका, पोस्ट, पतसंस्था सकाळी १० ते ३ पर्यंत सुरु राहतील. एमआयडीसीतील उद्योग, कारखाने.

-------------------

हे असेल बंद

चित्रपट गृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक व्यवसाय, नाट्यगृह, सभागृहे, खासगी क्रीडांगणे, केश कर्तनालय, सलुन, ब्युटी पार्लर,उद्यान, बगिचे, सेतू सेवा केंद्र,

Web Title: Curfew again in the district from May 16 to 22

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.