दर्यापूर पंचायत समिती उपसभापतींवर प्राणघातक हल्ला

By Admin | Published: August 17, 2016 11:58 PM2016-08-17T23:58:37+5:302016-08-17T23:58:37+5:30

शिवर येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जमिनीवर जनावरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांसह पंचायत समिती ...

Daryapur Panchayat Samithi, a deadly attack on the Deputy Speaker | दर्यापूर पंचायत समिती उपसभापतींवर प्राणघातक हल्ला

दर्यापूर पंचायत समिती उपसभापतींवर प्राणघातक हल्ला

googlenewsNext

गायरान जमिनीचा वाद : अन्य दोघेही जखमी
दर्यापूर : शिवर येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जमिनीवर जनावरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांसह पंचायत समिती उपसभापती संजय देशमुख यांच्यावर अतिक्रमण धारकांनी कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. त्यांच्या डोळ्यांत मिरची पूड फेकून हा हल्ला झाला, हे विशेष. ही घटना बुधवारी शिवर गावबाहेरील नदीकाठावरील गायरान जमिनीवर घडली.
या हल्ल्यात तीन शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पंचायत समितीचे उपसभापती संजय देशमुख यांचा समावेश आहे. जखमींना दर्यापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र,प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शिवसेना पदाधिकाऱ्यांसह गावकऱ्यांनी दर्यापूर पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. तक्रारीच्या आधारे दर्यापूर पोलिसांनी प्रल्हाद पवार, देवीदास चव्हाण, अनिल पवार, पंजाब चोरपगार व अन्य काही महिलांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास दर्यापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन गवारे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)

गावातील काही शेतकऱ्यांचे फोेन आले. मी घटनास्थळी पोहोचलो. परंतु अतिक्रमण धारकांनी काही ऐकून न घेता माझ्यासह शेतकऱ्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून कुऱ्हाडीने मारहाण केली.
-संजय देशमुख, उपसभापती, पंचायत समिती, दर्यापूर

Web Title: Daryapur Panchayat Samithi, a deadly attack on the Deputy Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.