दर्यापूर तालुका दोन मोठ्या ग्रामपंचायती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:14 AM2021-01-20T04:14:28+5:302021-01-20T04:14:28+5:30
दर्यापूर : तालुक्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक वडनेर गंगाई येथे सहा प्रभागांतील एकूण १७ जागांपैकी समता पॅनेलने नऊ जागा ...
दर्यापूर : तालुक्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक वडनेर गंगाई येथे सहा प्रभागांतील एकूण १७ जागांपैकी समता पॅनेलने नऊ जागा जिंकल्या. ग्रामविकास पॅनेलचे आठ उमेदवार विजयी झाले. समता पॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये प्रकाश अंजनकार, मोहिनी हुतके, शालीकाराम कोल्हे, प्रकाश कानकिरड, लता कात्रे, गोकर्णा इंगळे, किरण लाजूरकर, दुर्गा लाखे, रमेश श्रीकृष्ण चव्हाण यांचा समावेश आहे. ग्रामविकास पॅनलच्या आठ विजयी उमेदवारांमध्ये शाहीउल्ला खान अब्दुल्ला खान, पुष्पा देशमुख, मीना रेठे, सागर देशमुख, अन्नपूर्णा वानखडे, ललिता कोथळकर, दिनकर देशमुख, शालिनी वानखडे यांचा समावेश आहे.
-------------------
येवदा ग्रामपंचायतमध्ये गड आला, पण सिंह गेला
येवदा: स्थानिक १७ सदस्यीय ग्रामपंचायतीवर बाळासाहेब राऊत यांच्या नेतृत्वातील ग्रामविकास पॅनेलने ११ सदस्य निवडून आणून वर्चस्व प्रस्थापित केले. प्रतिस्पर्धी प्रदीप देशमुख यांच्या समता पॅनलचे पाच उमेदवार निवडून आले, तर प्रहारच्या जनशक्ती विकास आघाडीचा एक उमेदवार निवडून आला. पॅनेलप्रमुख बाळासाहेब राऊत मात्र पडले. सुयोग टोबर, इंदू ठाकरे, देविदास कोकाटे, अमानुल्ला खाँ, अनिता तिडके, रंजित सोळुंके, जदा नर्गिस मो. नासीर, राजेश गणोरकर, मोहम्मद मुजम्मिल जमादार, अंजली कैकाडी, प्रतिभा मोहोड, शारदा लहाने, अनुराधा करुले, प्रदीप देशमुख, मुरलीधर बगाडे, सविता धारपवार, वैशाली मोहोड हे विजयी झाले.