शहरं
Join us  
Trending Stories
1
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
2
“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा
3
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
IND vs PAK मॅचमधील भारतीय कॅप्टन अन् युधजीत यांनी घेतलेला मस्त रिले कॅच एकदा बघाच (VIDEO)
5
२०० रुपयांसाठी देशासोबत विश्वासघात! पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवणाऱ्या मजुराला गुजरातमधून अटक
6
ICC Champions Trophy 2025 : जर हट्ट सोडला नाही तर PCB ला बसेल मोठा फटका; BCCI च्या मनासारखं होणार?
7
₹१८० वर जाणार TATA चा 'हा' शेअर, आताही २२% स्वस्त; LIC कडे आहेत ९५ कोटी शेअर्स 
8
Video - कष्टाचं फळ! मजूर झाला डॉक्टर; दिवसा रोजंदारीवर काम अन् रात्री खूप अभ्यास
9
शेकडोंचा जमाव, घोषणाबाजी, दगड-विटांचा मारा, बांगलादेशात तीन मंदिरांची तोडफोड
10
शुक्र-चंद्र योग: १० राशींना झटपट लाभ, विशेष कृपा; सुख-समृद्धी वृद्धी, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ!
11
विधानसभेच्या मतदानाआधीच काँग्रेसला लागली होती पराभवाची कुणकूण? तो अंतर्गत सर्व्हे चर्चेत
12
स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका
13
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
14
वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स?
15
स्वप्नील जोशीने दिली 'मुंबई पुणे मुंबई ४' ची हिंट? मुक्ता बर्वेला टॅग करत म्हणाला...
16
Kalki Koechlin : "मी पैशासाठी अनेक गोष्टी..."; २ वर्षे काम नाही; वडापाव खाऊन अभिनेत्रीने काढले दिवस
17
"१०४ वर्षांचा झालोय, मला आता सोडा"; हत्या प्रकरणातील दोषीच्या याचिकेवर कोर्टाने दिला निर्णय
18
अरे बापरे! "कशाला लाज वाटायची?" म्हणत २४ वर्षीय मुलीने ५० वर्षांच्या वडिलांशी केलं लग्न
19
किंग कोहली अन् रुटपेक्षाही फास्टर ठरला Kane Williamson; जाणून घ्या त्याचा खास रेकॉर्ड
20
"आमच्याकडे हिंदू सुरक्षित, भारतातच अल्पसंख्यांकावर..."; बांगलादेशने प्रत्युत्तर देताना लावले आरोप

गर्दीचा फायदा घेऊन ‘ते’ चोरायचे बँक खात्याचा ‘डेटा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 12:13 AM

एटीएममधील गर्दीचा फायदा घेऊन आरोपी बँक खातेदारांच्या मागे उभे राहून 'डेटा' चोरायचे व तत्काळ मोबाईलवरून तो 'डेटा' दिल्लीतील बॉसला पाठवायचे.

ठळक मुद्देएटीएम क्लोनिंगप्रकरण : सेन्ट्रल लॉजवर थांबले होते आरोपी

आॅनलाईन लोकमतअमरावती : एटीएममधील गर्दीचा फायदा घेऊन आरोपी बँक खातेदारांच्या मागे उभे राहून 'डेटा' चोरायचे व तत्काळ मोबाईलवरून तो 'डेटा' दिल्लीतील बॉसला पाठवायचे. या कामासाठी तीन आरोपी चित्रा चौकातील सेन्ट्रल लॉजवर थांबले होते. या आरोपींनी अमरावती व बडनेरा शहरातील एटीएम खातेदारांचे डेटा चोरण्यासाठी विड्रॉल रक्कमेवर १० टक्के कमिशन घेतले.अमरावती सायबर सेल पोलिसांनी दिल्लीतून परितोष पोतदार याला अटक केल्यानंतर चौकशीत धक्कादायक माहिती पुढे आली. या आंतरराष्ट्रीय टोळीचा मुख्य सूत्रधार बिसवास हा दिल्लीत बसून सूत्रे हलवित असल्याचे निदर्शनास आले. त्याचे सर्व मोहरे विविध राज्यांत पसरवून बँक खातेदारांची माहिती चोरत होते. सायबर सेलने सीसीटीव्हीत आढळलेल्या आरोपींचे शोधकार्य सुरू केले होते. त्याच्या शोधात पोलीस गुडगाव, नोएडा, जालना, वरोरा, औरगांबादपर्यंत गेले. पोलिसांनी परितोष पोतदारच्या दिल्लीतील राहत्या ठिकाणी सापळा रचून त्याला अटक केली. मुख्य आरोपी बिसवास तीन जणांकडे विदर्भ व मराठवाड्यातील एटीएमधारकांचा डेटा चोरण्याचे काम सोपविले होते. त्यानुसार तिघेही सर्वप्रथम बडनेऱ्यात आले आणि विशालच्या नातेवाईकाकडे राहिले. आठ दिवसांच्या मुक्कामात त्यांनी बडनेरातील एटीएमधारकांची माहिती चोरली. त्यानंतर ते पुन्हा चंद्रपूरला गेले. चंद्रपुरातील दोन खातेधारकांचा डेटा चोरला. त्यानंतर ११ ते १६ सप्टेंबरदरम्यान ते तिघेही अमरावतीच्या चित्रा चौकातील सेन्ट्रल लॉजवर थांबले.

आरोपी बॉस-सीए, महिला विधीज्ञत्यांनी शहरातील २४ बँक खातेदारांचा डेटा चोरून तो दिल्लीतील बॉसपर्यंत पोहोचविला. त्यानंतर एटीएम क्लोनिंग करून बँक खातेदारांचे पैसे विविध शहरांतील एटीएममधून चोरण्यात आली आहे. या आरोपींनी उस्मानाबाद, जालना, नांदेड, सोलापूर, गडचिरोली, वर्धा, औरंगाबाद येथील खातेदारांची सुद्धा माहिती चोरली. आरोपींनी विमानाने प्रवास करून दिल्ली गाठली .एटीएम क्लोनिंग प्रकरणातील मुख्य सूत्रधार हरिदास बिस्वास (रा.दिल्ली) हा चार्टर अकाउंटंट असून त्याच्या सोबतची एक महिला विधीज्ञ आहे. त्यांचा एक साथीदार हॉटेल मॅनेजमेंटमध्ये प्राविण्यप्राप्त आहे. या तीनही आरोपींनी विविध मोहऱ्यांचा वापर करून एटीएमधारकांचा डेटा चोरला आणि एटीएम क्लोनिंग केल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले.मीडियाच्या बातम्यांचा घेतला आधारएटीएम क्लोनिंग करणारी आंतरराष्ट्रीय टोळी मीडियाच्या बातम्यांचे अपडेट घेत होते. त्या बातम्या गोळा करून पोलिसांच्या तपासाची स्थिती जाणून घ्यायचे. बँक खात्यातून रक्कम चोरीची बातमी झळकताच त्या रक्कमेवर आरोपींचे कमिशन अवलंबून राहायचे. यामध्ये डेटा चोरणाºया एका आरोपीला तीन लाख रुपये कमिशन मिळाल्याची माहिती आहे.असे चोरायचे 'डेटा'एटीएममधील गर्दी पाहून तिघेही रांगेत उभे राहायचे. ज्या व्यक्तीच्या हातात एटीएम असेल, त्यावर लक्ष केंद्रित करून त्याच्या एटीएमवरील १६ अंकापैकी आठ अंक मोबाईलवर टाईप करून ठेवायचे आणि ते आठ अंक तत्काळ दिल्लीतील बॉसच्या मोबाईलवर पाठवायचे. त्यानंतर संबंधित व्यक्ती विड्रॉल करतेवेळी लपून त्याचा पासवर्ड पाहायचे आणि ते चार अंक लक्षात ठेवायचे. पुढील प्रक्रिया दिल्लीत चालायची. त्यांचे आठ अंक व पासवर्ड टॅली करण्याचे काम हे बिसवास दिल्लीत बसून करायचा. त्यानंतर त्याचे मोहरे एटीएम क्लोनिंग करून विविध ठिकाणच्या एटीएममधून पैसे विड्रॉल करायचे.आठ अंकासाठी दिवसभर येरझराआरोपी दररोज शहरातील विविध एटीएमवर जायचे, ज्या ठिकाणी गर्दी दिसते, तेथील रांगेत उभे राहून एटीएम्धारकांचा १६ अंकापैकी आठ अंक क्रमांक पाहण्याचे प्रयत्न करायचे. अनेकदा त्यांनी घेतलेले क्रमांक हे चुकीचे असल्याचे त्यांना दिल्लीवरून लगेच कळायचे. त्यामुळे ते पुन्हा एटीएमवरील आठ अंक पाहण्याचे काम सुरू ठेवायचे. तासभरात तीन ते चार जणांचे एटीएम अंक मिळविल्यानंतर ते पुन्हा परत लॉजवर जायचे. आणखी दोन तासांनी पुन्हा एखादे एटीएम गाठून खातेदारांचा डेटा चोरायचे. दिवसभरात ४० ते ५० खातेदारांच्या एटीएमचा डेटा चोरून आठ अंक व पीनकोडची माहिती आरोपी मिळवायचे.सायबर टीमचे यशएटीएम क्लोनिंग प्रकरणात पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, शशिकांत सातव, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक कान्होपात्रा बन्सा, राजेंद्र चाटे, पोलीस शिपाई प्रकाश जगताप, सुभाष पाटील, उमेश कापडे, संग्राम भोजने, सचिन भोयार, मयूर, महिला पोलीस स्वाती बाजारे, लोकेश्वरी, दीपिका कोसले यांनी तपास केला. दिल्लीतील आरोपी पोतदारला पकडण्यासाठी पोलिसांनी १८ तास पाळत ठेवली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यास त्यांना आले.