तिवसा : कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता अतिशय साधेपणाने २३ डिसेंबर रोजी श्री संत अच्युत महाराज संस्थान,शेंदूरजना बाजार येथे श्री दत्तजयंती सप्ताहास तिर्थस्थापणेने प्रारंभ झाला.यानिमित्ताने कोविड १९ अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत संस्थानचे कोषाध्यक्ष सतिश सावरकर व बबिता सतीश सावरकर यांचे हस्ते ही तीर्थस्थापना करण्यात आली.दरवर्षी मोठ्या उत्साहात तिवसा तालुक्यातील शेंदुरजना बाजारच्या संत अच्युत महाराज संस्थान येथे दत्तजयंती महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमातून साजरा केल्या जातो मात्र यावर्षी येथील उत्सव हा अतिशय साधेपणाने साजरा करण्यात येत असून आज संत अच्युत महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून तिर्थस्थापना करण्यात आली. यावेळी सस्थान चे अध्यक्ष अनिलपंत सावरकर ,सचिव मनोहरराव निमकर,सहसचिव नारायणराव बोडखे,राजेंद्र सावरकर,जगदीश काळे,वामनराव भोजने, पवन भोजने,शेळके महाराज,श्रीराम सावरकर ,सारंग उमप, व सं स्थ्यान चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते ,गावकरी मंडळी उपस्थित होती.
शेंदूरजना बाजार येथे दत्तजयंती महोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 4:13 AM