एरंडगाव परिसरात डिटोनेटर, जिलेटिनचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:11 AM2021-01-14T04:11:29+5:302021-01-14T04:11:29+5:30

चांदूर रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई, चालकाला घेतले ताब्यात चांदूर रेल्वे : एरंडगाव परिसरात स्फोटक पदार्थ वाहून नेणारा ट्रॅक्टर पकडल्याची ...

Detonator, stock of gelatin seized in Erandgaon area | एरंडगाव परिसरात डिटोनेटर, जिलेटिनचा साठा जप्त

एरंडगाव परिसरात डिटोनेटर, जिलेटिनचा साठा जप्त

Next

चांदूर रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई, चालकाला घेतले ताब्यात

चांदूर रेल्वे : एरंडगाव परिसरात स्फोटक पदार्थ वाहून नेणारा ट्रॅक्टर पकडल्याची मोठी कारवाई ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात चांदूर रेल्वे पोलिसांनी सोमवारी सायंकाळी केली. २६४ नग डिटोनेटर (पांढऱ्या रंगाच्या काड्या) व २०० नग जिलेटिन फ्यूज जप्त करून एकाला ताब्यात घेण्यात आले.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक मोतीराम पवार, पोलीस कर्मचारी गजेंद्र ठाकरे व मनोज वानखडे हे मालखेड परिसरात गस्त करीत असताना एरंडगाव शिवारातील एका शेतात विहिरीवर ब्लास्टिंग करण्यासाठी ट्रॅक्टरमध्ये स्फोटक पदार्थ वाहून नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी पोलीस निरीक्षक मगन मेहते यांना सदर माहिती दिली. यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर रस्त्याच्या मधात थांबवून चौकशी केली असता, विनापरवाना २६४ नग डिटोनेटर व २०० नग जिलेटिन फ्यूज आढळून आले. ट्रॅक्टरवर ड्रिल मशीनचे स्टँड तयार करून त्यावर एक लोखंडी ड्रिल मशीन लागलेली दिसून आली.

चालक ताब्यात

स्फोटक पदार्थ बाळगत असतानाही त्याबाबत काळजी न घेता जीवितास अथवा मालमत्तेस हानी पोहचू शकेल अशा स्थितीत डेटोनेटर व जिलेटिन मिळून आल्याने ट्रॅक्टरचा चालक सूरज चंद्रकांत पाचगडे (३०, रा. नांदगाव खंडेश्वर) याच्याविरुद्ध कलम ५ स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८, सहकलम ५, ९ (ब) (१) (ब) भारतीय स्फोटक कायदा १८८४ प्रमाणे कारवाई करून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून स्फोटक पदार्थ, ड्रिल मशीन व एमएच २७ एल ६८९२ क्रमांकाचा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला.

Web Title: Detonator, stock of gelatin seized in Erandgaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.