प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटरला नापसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:10 AM2021-05-29T04:10:49+5:302021-05-29T04:10:49+5:30
पथ्रोट : प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम सुरू आहे. तेथे उपस्थित मजुरांच्या संख्येचा विचार करून त्या ठिकाणी कोविड सेंटर उभारणीला ...
पथ्रोट : प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम सुरू आहे. तेथे उपस्थित मजुरांच्या संख्येचा विचार करून त्या ठिकाणी कोविड सेंटर उभारणीला नापसंती देऊन पर्यायी जागा शोधण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले. अविश्यांत पंडा यांनी गुरुवारी पथ्रोटला भेट दिली.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये कोविड सेंटरची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. परंतु, या ठिकाणी इमारतीचे बांधकाम अजूनही अर्धवट स्थितीत आहे, शिवाय येथे दररोज बाह्यरुग्ण विभागात शेकडोंच्या संख्येने रुग्णसंख्या उपचाराकरिता येत आहे. कोरोनाचा संसर्ग त्यांना होऊन आणखी रुग्णवाढ होऊ नये, याकरिता याठिकाणी कोविड सेंटर न उभारता गावाबाहेरील संपूर्ण सोयीयुक्त असणाऱ्या मंगल कार्यालयात ते उभारण्यात यावे, अशी मागणी शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रमोद डिके यांनी केली होती. तर याच बाबींचा विचार करून डॉ. अजय कडू यांनीसुद्धा जयसिंग संस्थेची जागा कोविड सेंटरसाठी देण्याची तयारी असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी पथ्रोट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची पाहणी केली.
--------------------