जिल्ह्यात श्वानांनी १७ हजार व्यक्तिंना घेतला चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:11 AM2021-01-02T04:11:18+5:302021-01-02T04:11:18+5:30
अमरावती जिल्ह्यात मोकाट श्वानांची संख्या वाढली असून, रात्रीच्या वेळी वाहनधारकांच्या अंगावर धाऊन जाण्याच्या नित्याच्याच घटना घडत आहेत. यामध्ये जानेवारी ...
अमरावती जिल्ह्यात मोकाट श्वानांची संख्या वाढली असून, रात्रीच्या वेळी वाहनधारकांच्या अंगावर धाऊन जाण्याच्या नित्याच्याच घटना घडत आहेत. यामध्ये जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत १६७१६ व्यक्तिंना श्वानांनी चावा घेतल्याने रुग्णालयात उपचार घ्यावा लागला. बाह्यरुग्ण विभागात १५ हजार ९५४ रुग्णांनी उपचार केला असून, ३०० रुग्णांना घायाळ अवस्थेत रुग्णालयात भरती व्हावे लागले, तर ४६२ रुग्णांना गंभीररीत्या चावा घेतल्याने थेट उपचारार्थ भरती करावे लागल्याची नोंद जिल्हा सामान्य रुग्णालयाने घेतली आहे. यामध्ये धारणी तालुक्यात ११३ व्यक्तिंना, अंजनगाव सुर्जी-८८९, चांदूर रेल्वे ४२४, धामणगाव रेल्वे - २५४, तिवसा- ४२८, चुरणी ९३, अमरावती - १००६४, नांदगाव खंडेश्वर - ५७१, भातकुली - ३५०, वरूड - ६२६, अचलपूर - १११६, मोर्शी - ६७७, चांदूर बाजार - ३८२, तर दर्यापूर तालुक्यात ६८४ जणांना श्वानांनी चावा घेतल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.