वरूडमध्ये ठिबक, तुषार सिंचनाचे ३४२ प्रस्ताव धूळ खात

By admin | Published: February 25, 2016 12:12 AM2016-02-25T00:12:14+5:302016-02-25T00:12:14+5:30

विदर्भ सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत जलव्यवस्थापन करुन सिंचनाकरिता शेतकऱ्याकडून ठिबक आणि तुषार सिंचनाचे ...

Doubt in the woods, 342 proposals of Tushar Irrigation eat dust | वरूडमध्ये ठिबक, तुषार सिंचनाचे ३४२ प्रस्ताव धूळ खात

वरूडमध्ये ठिबक, तुषार सिंचनाचे ३४२ प्रस्ताव धूळ खात

Next

अनुदान नाही : २ कोटी ९३ लाख १२ हजारांचा निधी अपेक्षित
वरूड : विदर्भ सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत जलव्यवस्थापन करुन सिंचनाकरिता शेतकऱ्याकडून ठिबक आणि तुषार सिंचनाचे सन २०१४-१५ चे ३४२ प्रस्ताव अनुदानाअभावी तालुका कृषी कार्यालयात धूळखात असल्याने प्रलंबित आहेत. याकरिता २ कोटी ९३ लाख १२ हजार रुपये अनुदान अपेक्षित असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. तातडीने अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून वरूड तालुक्याचे नांव देशात अग्रेसर आहे. संत्रा, हळद, गहू, हरभरा, सोयाबिन, कपाशी, मिरचीचे पीक मोठया प्रमाणावर घेतले जाते. तालुक्यात विहिरी आणि बोअर मोठया प्रमाणावर असून पाण्याचा उपसा सुध्दा मोठया प्रमाणावर असल्याने पाणीटंचाई जाणवत असते. परंतु जलव्यवस्थापन, पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त शिवार, नालाखोलीकरण या माध्यमातून भूजल पातळी वाढविण्याचे कार्यक्रम सुरु आहेत. परंतु पिके जगविण्याकरीता शेतकऱ्यांना सतत धडपड करावी लगाते. याकरीता विदर्भ सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत मिळणाऱ्या अनुदानावरील ठिबक व तुषार सिंचन योजनेचा लाभ घेऊन पिके जगविण्याचा प्रयत्न असतो.
याकरतीा सन २०१४-१५ मध्ये २४२ तर तुषार सिंचनाकरिता १०० अशा ३४२ प्रस्तावांसह १ कोटी ६५ लाख रुपये अनुदानाचे लक्ष्य होते. परंतु ठिबक सिंचनाकरिता एक हजार ८६ तर तुषार सिंचनाकरीता २९८ प्रस्ताव प्राप्त झाले होते.
याकरीता ४ कोटी ४८ लाख ३३ हजार रुपयांचे अनुदान आवश्यक होते. यापैकी तालुका कृषी कार्यालयाकडून ठिबक सिंचनाकरीता ४२९ लाभार्थी ४५० हेक्टर ४५ आर जमिनीच्या क्षेत्राकरीता एक कोटी ३७ लाख ९३ रुपयांना परवानगी मिळाली होती तर तुषार सिंचनाकरिता १०८ लाभार्थी ९७ हेक्टर २ आर जमिनीकरिता १७ लाख २८ हजार रुपये असे ५३७ लाभार्थी, ५४७ हेक्टर ६५ आर क्ष्ोत्राकरीता एक कोटी ५५ लाख २१ हजार रुपयांच्या अनुदानाला पूर्व परवानगी देण्यात आली होती.
उर्वरित ठिबक सिंचनाचे ६३४ लाभार्थी, ६३५ हेक्टर ५५ आर क्षेत्राकरिता २ कोटी ७४ लाख ८६ हजार रुपये अनुदान आणि तुषार संचाचे १८१ लाभार्थी १८१ हेक्टर क्षेत्राकरिता १८ लाख २६ हजार रुपये अनुदानाचे एकूण २ कोटी ९३ लाख १२ हजार रुपयाचे ठिबक व तुषार सिंचन प्रस्ताव तालुका कृषी कार्यालयात धूळखात पडले आहेत.
या प्रस्तावांना अनुदानाची प्रतीक्षा असल्याने शेतकऱ्यामध्ये असंतोष उफाळून आला आहे. कृषी विभागाने तातडीने ठिबक व तुषार सिंचन योजनेचे अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात ठिबक व तुषार सिंचन झाले नाही तर पिके धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Doubt in the woods, 342 proposals of Tushar Irrigation eat dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.