शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
3
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
4
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
5
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
6
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
7
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
8
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
9
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
10
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
11
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
12
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
13
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
14
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
15
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
16
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
17
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
18
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
19
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
20
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम

वरूडमध्ये ठिबक, तुषार सिंचनाचे ३४२ प्रस्ताव धूळ खात

By admin | Published: February 25, 2016 12:12 AM

विदर्भ सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत जलव्यवस्थापन करुन सिंचनाकरिता शेतकऱ्याकडून ठिबक आणि तुषार सिंचनाचे ...

अनुदान नाही : २ कोटी ९३ लाख १२ हजारांचा निधी अपेक्षितवरूड : विदर्भ सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत जलव्यवस्थापन करुन सिंचनाकरिता शेतकऱ्याकडून ठिबक आणि तुषार सिंचनाचे सन २०१४-१५ चे ३४२ प्रस्ताव अनुदानाअभावी तालुका कृषी कार्यालयात धूळखात असल्याने प्रलंबित आहेत. याकरिता २ कोटी ९३ लाख १२ हजार रुपये अनुदान अपेक्षित असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. तातडीने अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून वरूड तालुक्याचे नांव देशात अग्रेसर आहे. संत्रा, हळद, गहू, हरभरा, सोयाबिन, कपाशी, मिरचीचे पीक मोठया प्रमाणावर घेतले जाते. तालुक्यात विहिरी आणि बोअर मोठया प्रमाणावर असून पाण्याचा उपसा सुध्दा मोठया प्रमाणावर असल्याने पाणीटंचाई जाणवत असते. परंतु जलव्यवस्थापन, पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त शिवार, नालाखोलीकरण या माध्यमातून भूजल पातळी वाढविण्याचे कार्यक्रम सुरु आहेत. परंतु पिके जगविण्याकरीता शेतकऱ्यांना सतत धडपड करावी लगाते. याकरीता विदर्भ सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत मिळणाऱ्या अनुदानावरील ठिबक व तुषार सिंचन योजनेचा लाभ घेऊन पिके जगविण्याचा प्रयत्न असतो. याकरतीा सन २०१४-१५ मध्ये २४२ तर तुषार सिंचनाकरिता १०० अशा ३४२ प्रस्तावांसह १ कोटी ६५ लाख रुपये अनुदानाचे लक्ष्य होते. परंतु ठिबक सिंचनाकरिता एक हजार ८६ तर तुषार सिंचनाकरीता २९८ प्रस्ताव प्राप्त झाले होते. याकरीता ४ कोटी ४८ लाख ३३ हजार रुपयांचे अनुदान आवश्यक होते. यापैकी तालुका कृषी कार्यालयाकडून ठिबक सिंचनाकरीता ४२९ लाभार्थी ४५० हेक्टर ४५ आर जमिनीच्या क्षेत्राकरीता एक कोटी ३७ लाख ९३ रुपयांना परवानगी मिळाली होती तर तुषार सिंचनाकरिता १०८ लाभार्थी ९७ हेक्टर २ आर जमिनीकरिता १७ लाख २८ हजार रुपये असे ५३७ लाभार्थी, ५४७ हेक्टर ६५ आर क्ष्ोत्राकरीता एक कोटी ५५ लाख २१ हजार रुपयांच्या अनुदानाला पूर्व परवानगी देण्यात आली होती. उर्वरित ठिबक सिंचनाचे ६३४ लाभार्थी, ६३५ हेक्टर ५५ आर क्षेत्राकरिता २ कोटी ७४ लाख ८६ हजार रुपये अनुदान आणि तुषार संचाचे १८१ लाभार्थी १८१ हेक्टर क्षेत्राकरिता १८ लाख २६ हजार रुपये अनुदानाचे एकूण २ कोटी ९३ लाख १२ हजार रुपयाचे ठिबक व तुषार सिंचन प्रस्ताव तालुका कृषी कार्यालयात धूळखात पडले आहेत. या प्रस्तावांना अनुदानाची प्रतीक्षा असल्याने शेतकऱ्यामध्ये असंतोष उफाळून आला आहे. कृषी विभागाने तातडीने ठिबक व तुषार सिंचन योजनेचे अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात ठिबक व तुषार सिंचन झाले नाही तर पिके धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. (तालुका प्रतिनिधी)