प्रारूप रचना ‘लीक’: दोषींवर फौजदारी दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 05:00 AM2022-01-07T05:00:00+5:302022-01-07T05:01:03+5:30
बसपाचे शहर प्रभारी अक्षय माटे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना करताना गाेपनीयता राखून व नियमांचे काटेकोरपणे पालन करून ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत करून प्रारूप रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाकडे प्रारूप रचना सादर होण्यापूर्वी स्थानिक वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आला. निवडणूक आयोगाचे कामकाज अत्यंत संवेदनशील असताना प्रभागरचना ‘लीक’ झाल्याप्रकरणी चौकशीसाठी समिती गठित झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने तयार केलेला प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा ‘लीक’ झाल्याप्रकरणी संंबंधित दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टीने केली आहे. या आशयाचे निवेदन आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्याकडे दिले आहे.
बसपाचे शहर प्रभारी अक्षय माटे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना करताना गाेपनीयता राखून व नियमांचे काटेकोरपणे पालन करून ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत करून प्रारूप रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाकडे प्रारूप रचना सादर होण्यापूर्वी स्थानिक वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आला. निवडणूक आयोगाचे कामकाज अत्यंत संवेदनशील असताना प्रभागरचना ‘लीक’ झाल्याप्रकरणी चौकशीसाठी समिती गठित झाली. तीन सदस्यीय समितीच्या चौकशी अहवालानुसार बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सुधीर गोटे, नगररचना विभागाचे सहायक अभियंता हेमंत महाजन यांचे निलंबन, तर कंत्राटी आरेखक प्रभाकर देवपुजारी यांची सेवासमाप्तीची कारवाई केली. मात्र, याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषी तिघांवरही फौजदारी कारवाईसाठी आयुक्तांनी पुढाकार घ्यावा, अन्यथा बसपा तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा अक्षय माटे, रामदास कुरवाडे, विनय पहाळण, नितीन खांडेकर, देवेंद्र कांबळे, रामभाऊ पाटील आदींनी दिला आहे.