बडनेऱ्यात दुसऱ्या डोजचा कालावधी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:13 AM2021-05-06T04:13:36+5:302021-05-06T04:13:36+5:30
बडनेरा : येथील मोदी दवाखान्याच्या लसीकरण केंद्राला दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असून, अनेकांना आपला दुसरा डोज केव्हा मिळणार, ...
बडनेरा : येथील मोदी दवाखान्याच्या लसीकरण केंद्राला दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असून, अनेकांना आपला दुसरा डोज केव्हा मिळणार, हा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. पाच दिवसांपासून या केंद्रावरील लसीकरण थांबले आहे.
बडनेराच्या मोदी दवाखान्यात ५ मार्च रोजी लसीकरणाला सुरुवात झाली. तब्बल दोन महिने पूर्ण झाले. येथे कोविशिल्ड लस दिली जाते. या लसीच्या दुसऱ्या डोजचा सहा ते आठ आठवड्यांचा कालावधी असल्याने अनेकांचा त्रास वाढला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात लसीकरणाला येथे उत्तम प्रतिसाद होता. नंतर मात्र ज्यांचे दोन महिने पूर्ण होत आहे, असे अनेक लोक सात ते आठ दिवसांपासून पहाटेच रांगेत उभे राहत आहेत. लसीचा साठाच नसल्याने नागरिकांना आल्यापावली परत जावे लागत आहे. बडनेरा शहराला बरीच खेडी जोडलेली आहे. शहराची लोकसंख्या आजूबाजूचा परिसर याचा विचार करून प्रशासनाने येथील केंद्राला दररोजचा लसीचा आधिक पुरवठा करणे गरजेचे आहे. प्राधान्याने सुरुवातीच्या टप्प्यात पहिली लस घेणाऱ्यांना दुसरा डोज दिला पाहिजे. लस घेणाऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेता नागरिकांच्या सोयीसाठी ट्रामा केअर दवाखान्यात दुसरे लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी शहरवासीयांसह नगरसेवकांची मागणी आहे. लसींचा पुरवठा वाढविल्यास याठिकाणी १८ ते ४४ या वयोगटाचा डोजदेखील सुरू करता येईल. जुन्या वस्तीतील मनपा हरिभाऊ वाठ या दवाखान्यात देखील नागरिक लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत.