विद्यार्थ्यांनी घडविल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:15 AM2021-09-14T04:15:43+5:302021-09-14T04:15:43+5:30
भारतीय महाविद्यालयाचा उपक्रम, शहरवासीयांचे प्रबोधन मोर्शी : भारतीय महाविद्यालयाच्या रासेयो पथकातील विद्यार्थ्यांनी मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडविल्या असून ‘ना ...
भारतीय महाविद्यालयाचा उपक्रम, शहरवासीयांचे प्रबोधन
मोर्शी : भारतीय महाविद्यालयाच्या रासेयो पथकातील विद्यार्थ्यांनी मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडविल्या असून ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर त्या शहरवासीयांसाठी उपलब्ध केल्या होत्या. या उपक्रमाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे रासेयो संचालक राजेश बुरंगे व सिनेट सदस्य ओमप्रकाश मुंदे यांनी भेट देऊन पाहणी केली.
प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविण्यात आलेल्या गणेशमूर्ती पाण्यात लवकर विरघळत नाहीत. त्या सात ते आठ दिवस तशाच तरंगत राहतात. त्यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश बीजवे, रासेयो कार्यक्रम अधिकारी सावन देशमुख आणि महिला कार्यक्रम अधिकारी एल.आर. टेंभुर्ण यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी मूर्ती घडविल्या. एवढेच नव्हे तर दहा दिवस स्टॉल लावून ते माहिती देत आहेत.
याप्रसंगी प्राचार्यांसह सावन देशमुख, एल.आर. टेंभुर्ण, रजनीश बांबोळे, शिरीष टोपरे, विनायक खांडेकर, दीपक काळे, भगवान साबळे, अरविंद पाझारे, गोपाल भलावी, विनायक देशपांडे, मनोज वहाने, राज धोटे, भरतसिंह तसेच रासेयोचे स्वयंसेवक प्रीतम कोंघे, इरफान शेख, प्रतीक वाहिले, राहुल मानकर, साहिल कान्हेरकर, प्रतीक आखरे, तेजस हिवे, भूषण खडसे, निखिल नरसिंगकर, आवेज शेख, धनश्री रोडे, रिद्धी बच्छ, रोशनी तट्टे, श्रद्धा एकोटखाने, पल्लवी ठाकरे, पूनम टोहने, कोमल गजबे, आचल लुंगे, निशा कुकडे, राखी बडासे, मयूरी चौधरी आदी उपस्थित होते.