‘आसमां निगल गया या जमीं खा गयी ?’

By admin | Published: May 25, 2017 12:06 AM2017-05-25T00:06:02+5:302017-05-25T00:06:02+5:30

आयपीएल क्रिकेट सट्टा प्रकरणातील मुख्य बुकी कुख्यात संजय उदापूरकर १२ दिवसांपासून पसार आहे.

'Is the egg swallowed or eaten the ground?' | ‘आसमां निगल गया या जमीं खा गयी ?’

‘आसमां निगल गया या जमीं खा गयी ?’

Next

गेला कुठे उदापूरकर? : पोलिसांपेक्षा सट्टा किंग चाणाक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : आयपीएल क्रिकेट सट्टा प्रकरणातील मुख्य बुकी कुख्यात संजय उदापूरकर १२ दिवसांपासून पसार आहे. एसपी अभिनाष कुमार यांच्या नेतृत्वातील पोलीस दल या बुकीला पकडण्यात अपयशी ठरले आहे. त्याच्या ठावठिकाण्याबाबत सामान्यजनांमध्ये चर्चा होत असताना पोलिसांना तो सापडू नये, हे आश्चर्यच. ‘आसमां निगल गया, या जमीं खा गयी’ असा सवाल याप्रकरणी उपस्थित होत आहे.
पोलीस अधीक्षकांनी प्रारंभी अनेक दिवस चुप्पी साधली. मौन सोडले त्यावेळी उदापूरकरला अटक केली जाईल, असे रुटीन उत्तर त्यांनी दिले. मात्र पोलिसांना ‘आॅपरेशन उदापूरकर’मध्ये ठोस यश आले नाही.
वास्तविकत: उदापूरकर हा जिल्ह्यातील सट्टा किंग म्हणून नावारुपास आला असून त्याचा मुख्य बुकीत समावेश आहे. वरलीमटक्याचे जाळे, क्रिकेट सट्ट्यातून भरमसाठ कमाई हे ध्येय संजय उदापूरकरने पोलिसांच्या मदतीनेच पुर्णत्वास नेले आहे. जिल्ह्यात जवळपास सर्व तालुक्यात त्याचे एजंट असून ते मटक्यासह क्रिकेट बुकी घेतात. उदापूरकर परतवाडा येथील छोटा बाजार परिसरातून हे संपूर्ण नेटवर्क सांभाळतो. धारणी व चिखलदरा तालुक्यात त्याचे अनेक टेबल हाऊस चालत असल्याची माहिती आहे. तो सट्टा किंग असल्याचे पोलीस दलात सर्वश्रूत आहे.
१२ मे रोजी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी स्थानिक सावकारपुरा भागात धाड टाकून आयपीएल क्रिकेट सट्टा लावणाऱ्या तिघांना अटक केली होती. या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार संजय उदापूरकर असल्याचा जबाब आरोपींनी दिला होता. दरम्यान त्याला अटक करण्यास पोलीस दिरंगाई करीत होते. तो राजस्थानात आहे. त्याचा फोटो उपलब्ध नाही, असेही सांगण्यात आले होते. मात्र, त्याला अटक केल्यावर जामीन मिळू नये, असे प्रयत्न करीत असल्याचे सांगून स्वत:चा बचाव पोलिसांनी केला होता.‘लोकमत’ने उदापूरकरचा फोटो प्रसिद्ध करताच तो लवकरच जेरबंद होईल, अशी संकेत होते. मात्र संजय उदापूरकर गत १२ दिवसांपासून पसार आहे. त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले नाही. उदापूरकर पसार होणे ही बाब पोलिसांसाठी नामुष्कीची ठरली, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

राजस्थानात नव्हे जिल्ह्यात लपून बसलाय उदापूरकर
कुख्यात संजय उदापूरकरचा मोबाईल ट्रेस केला जात असून तो राजस्थानात असल्याची माहिती पोलीस देत आहे. मात्र, तो जिल्ह्यातच असल्याची विश्वसनीय माहिती आहे. उदापूरकर मेळघाटात लपून आहे. येथील एका स्थानिक नेत्याने त्याला आश्रय दिल्याचे उघडपणे बोलले जात आहे. आश्रयदात्या राजकीय नेत्याला सध्या फंडची गरज असल्याने उदापूरकर याला मदत मिळत असल्याची माहिती आहे.

Web Title: 'Is the egg swallowed or eaten the ground?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.