मोर्शी : अप्पर वर्धा धरणस्थळी रविवारी पर्यटकांनी तोबा गर्दी केली. शनिवारी धरणाची ११ दारे उघडण्यात आलीत. रविवारी सुटीच्या दिवशी हजारो नोकरदार, स्थानिक व अन्य पर्यटकांनी नलदमयंतीसागर’चे जलतुषार अंगावर घेण्यासाठी सिंभोरा धरणस्थळ गाठले. त्यामुळे ट्रॅफिक जाम झाला. ९ सप्टेंबर रोजी धरणात १०० टक्के जलसंचय झाला. त्यानंतर दोन, तर कधी तीन असे एकूण ११ दरवाजे उघडण्यात आलेत. त्यामधून कोसळणाऱ्या धवल जलधारा मनात साठवून ठेवण्यासाठी हजारोजन धरणस्थळी पोहोचले. मोर्शी शहरातून सिंभोऱ्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गावर सुमारे आठ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. नदीच्या पुलावर पाय ठेवायलाही जागा नव्हती. पर्यटकांना चार ते पाच किमीची पायपिट करावी लागली. २२ सप्टेंबरला सकाळी ७ च्या नोंदीनुसार, धरणाची ११ दारे १२ सेंमीने उघडण्यात आली. प्रतिसेकंद २१५ घनमीटर विसर्ग होत आहे.
अप्पर वर्धावर आठ किमीचा ‘ट्रॅफिक जाम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 6:00 AM
९ सप्टेंबर रोजी धरणात १०० टक्के जलसंचय झाला. त्यानंतर दोन, तर कधी तीन असे एकूण ११ दरवाजे उघडण्यात आलेत. त्यामधून कोसळणाऱ्या धवल जलधारा मनात साठवून ठेवण्यासाठी हजारोजन धरणस्थळी पोहोचले. मोर्शी शहरातून सिंभोऱ्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गावर सुमारे आठ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या.
ठळक मुद्देरविवार : पर्यटकांची तोबा गर्दी