अनिल कडूलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ब्रम्हपुरीवरून मेळघाटात दाखल ई-वन वाघिणीवर हत्तीवरून नजर ठेवण्यात येत आहे. याकरिता दोन हत्ती त्या परिसरात तैनात आहेत. तिच्या प्रत्येक हालचालीची माहिती मिळविण्याकरिता गुगामल वन्यजीव विभागाचे खास पथक वाकीटॉकीसह त्या क्षेत्रात तैनात आहे.दोन वर्षे वयाची ही वाघीण जंगलात वास्तव्यास सक्षम असली तरी मागील चार दिवसांत मेळघाट वनक्षेत्रात ती स्थिरावलेली नाही. येथे तिचा मुक्त संचार असला तरी अद्याप ती शांत आहे. तिचा आहारही मंदावला आहे. ती कमी खात आहे. यातच या नव्या वनक्षेत्राचे अवलोकन करीत येथील वातावरणाशी जुळवून घेण्याचा ती प्रयत्न करीत आहे.दरम्यान, वनक्षेत्रातील पाणवठ्यावरील पाण्यात भिजण्याचा तिने मनसोक्त आनंद घेतला आहे. बहुतांश वेळ ती या पाण्यात घालवत आहे.
पहिली शिकारमेळघाटातील जंगलात सोडल्यानंतर तिने शिकार करणे अपेक्षित होते. याकरिता एक गोऱ्हा त्या परिसरात ठेवण्यात आला होता. तिला खाण्यास मांसही टाकण्यात आले होते. दरम्यान तिने त्या गोहृयाची शिकार केली. तिची मेळघाटातील ही पहिली शिकार ठरली आहे.