कोरोनापासून बचाव; माधान येथे योगाभ्यासाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:10 AM2021-05-29T04:10:52+5:302021-05-29T04:10:52+5:30

युवा शिक्षकाचा उपक्रम चांदूर बाजार : कोरोनापासून बचावासाठी शरीराला ऑक्सिजनची आवश्यकता आहे. यामुळे या काळात ही नागरिक सुदृढ राहावे, ...

Escape from the corona; Yoga lessons at Madhan | कोरोनापासून बचाव; माधान येथे योगाभ्यासाचे धडे

कोरोनापासून बचाव; माधान येथे योगाभ्यासाचे धडे

Next

युवा शिक्षकाचा उपक्रम

चांदूर बाजार : कोरोनापासून बचावासाठी शरीराला ऑक्सिजनची आवश्यकता आहे. यामुळे या काळात ही नागरिक सुदृढ राहावे, या अनुषंगाने तालुक्यातील माधान येथील युवा शिक्षक दररोज सकाळी व संध्याकाळी युवक, ग्रामस्थांना योगासने शिकवून चांगला संदेश देत आहेत.

माधान येथील ३० युवक सैन्यात, १० तरुण पोलीस व इतर काही आस्थापनांमध्ये बडे अधिकारी झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात गावात कोरोनाचा प्रादुर्भावामुळे युवकांना हानी होऊ नये, याकरिता स्थानिक युवा शिक्षक धीरज थोरात त्यांना योगासनाचे धडे देत आहेत. यामध्ये भूषण मेटकर, धीरज कापडे, शंतनु वानखडे, आशिष खंडारे, महिंद्र गाडे, मयूर रेवळकर, शुभम मनोहरे, श्रेयस गोहत्रे, अभिजित तायडे, अक्षय मनोहरे, सोपान चिंचोळकर, अभिषेक सोळंके, सूरज मोहोड, आकाश खंडारे सहभागी होत आहेत.

Web Title: Escape from the corona; Yoga lessons at Madhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.