लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी शनिवारी तालुक्यातील पहूर गावातील आमदार निधीतून रस्ता, जावरा (मोळवण) येथील दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत काँक्रीट नाली व व खेड पिंप्री येथील ग्रामपंचायत भवन व काँक्रीट रस्ता आणि नाली बांधकामाचे भूमिपूजन केले. आमदार जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे या परिसरात विकासकामांचा धडाका सुरू आहे.आ. वीरेंद्र जगताप यांच्यासोबत पंचायत समिती सभापती बाळासाहेब इंगळे, अमोल धवसे, फिरोज खान, अशोक दैत, सरफराज, प्रदीप ब्राह्मणवाडे, नरेंद्र थोरात आदी पदाधिकारी उपस्थित होते. विरोधी पक्षातील आमदाराने क्वचितच इतकी विकासकामे व त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला असेल, अशी सकारात्मक प्रतिक्रिया मतदारसंघात उमटली आहे. यावेळी पहूर येथील सरपंच वनिता शिंदे, उपसरपंच सूरज ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य मोरेश्वर भेंडे, नागोराव शिंदे, राधा मारबदे, शालिनी भगत, शारदा मारबदे, अण्णाभाऊ टेळे, शाहूराव जेठे, श्यामगीर गिरी, संदीप बेले, पद्माकर भेंडे, हरिभाऊ जेठे, रुपराव झिमटे, नानासाहेब मारोटकर, ज्ञानेश्वर थोरात, प्रवीण खडसे, नामदेव मारबदे, गणेशराव ठाकरे, गोपाळ जेठे, सूर्यभान मेश्राम, पुंडलिक मारबदे तसेच जावरा येथील मधुकर दहातोंडे, सुनील फिसके, संगीता सरदार, अमित दहातोंडे, सुधीर गुल्हाने, पप्पू थोरात, अतुल झाडे, रंगराव शिरभाते, दिवाकर देवरे आणि खेड पिंप्री येथील मोहन ठाकरे, महादेवराव जाधव, किसन खंडारे, गोविंदराव तट्टे, किसनराव भारती, सुनील साठे, भगवंत कडू व बरीच मंडळी होती.गावागावांत विकासकामेधामणगाव रेल्वे तालुक्यातील चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर व धामणगाव रेल्वे या तीन तालुक्यांच्या नगरपालिका, नगरपंचायतीसह ग्रामीण भागातील प्रत्येक गावात विकासाची गंगा पोहोचली आहे. प्रत्येक गावात रस्ते, नाल्या, सभागृह, पाण्याची व्यवस्था, स्मशानभूमी अशा मूलभूत सुविधांवर भर दिला जात आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांद्वारे विकास प्रत्यक्षात गावागावांत पोहचविण्याचे प्रयत्न मतदारसंघात होत आहेत.
पहूर, जावरा, मोळवण येथे विकासकामांचा धडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 11:53 PM
आमदार वीरेंद्र जगताप यांनी शनिवारी तालुक्यातील पहूर गावातील आमदार निधीतून रस्ता, जावरा (मोळवण) येथील दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत काँक्रीट नाली व व खेड पिंप्री येथील ग्रामपंचायत भवन व काँक्रीट रस्ता आणि नाली बांधकामाचे भूमिपूजन केले. आमदार जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे या परिसरात विकासकामांचा धडाका सुरू आहे.
ठळक मुद्देवीरेंद्र जगताप : रस्ते, नाली, ग्रामपंचायत भवनाचे भूमिपूजन