अनुदानावरील बियाण्यांच्या अर्जासाठी २० मे पर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:12 AM2021-05-16T04:12:53+5:302021-05-16T04:12:53+5:30
अमरावती : शासनाचे महा-डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना शीर्षकांतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे मिळणार आहे. यासाठीची अंतिम तारीख १५ मे होती. ...
अमरावती : शासनाचे महा-डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना शीर्षकांतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे मिळणार आहे. यासाठीची अंतिम तारीख १५ मे होती. त्याला आता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार २० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तसे आदेश कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी जारी केले.
शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत महा-डीबीटी पोर्टल हे एकात्मिक संगणकीय प्रणाली शासनाद्वारा विकसित करण्यात आलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबी निवडीचे स्वातंत्र देण्यात आलेले आहे. या सुविधेंतर्गत लाभार्थींनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत सोयाबीन, धान, तूर, मूग, उडीद, मका व बाजरी आदी बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहे. यासाठी आता २० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
महा-डीबीटी संकेतस्थळावरील ‘शेतकरी योजना’ या पर्यायात शेतकरी अर्ज करू शकतात. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छीणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. त्याशिवाय अनुदानाचे वितरण होणार नसल्याचे कृषी विभागाने सांगितले.