पान २ ची बॉटम
फोटो पी ०९ गुळवेल
अंजनगाव सुर्जी : जर योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात गुळवेलचे सेवन केले, तर आपल्याला आजारांचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. गुळवेलला गुडुची नावानेही ओळखले जाते. पानाच्या आकाराच्या असलेल्या या औषधी वनस्पतीचा रंग गडद हिरवा असतो. डेंग्यूचा ताप कमी करण्यासाठी गुळवेल रामबाण उपाय आहे. या औषधाच्या सेवनामुळे रुग्णाची प्रकृती सुधारण्यास मदत मिळते.
ताप उतरवणे, हाडांच्या वेदना कमी करणे यासह कित्येक शारीरिक त्रासातून गुळवेलीमुळे आपली सुटका होते. या वनस्पतीला अमृतवेल असेही म्हटले जाते. वात, तापानंतर येणारा अशक्तपणा, भूक न लागणे, रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणे आदी समस्यांवर उपाय म्हणून गुळवेलीचे सेवन करावे. गुळवेलमध्ये अँटी ऑक्सिडेंट्स, अँटी इन्फ्लेमेट्री गुणधर्म आहेत. यामध्ये ग्लुकोसाइड, फॉस्फोरस, कॉपर, कॅल्शियम, झिंक आणि मॅग्नेशियम यांसारखी खनिजेदेखील आहेत. हे घटक आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत, ज्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. आजारपणामध्ये प्रत्येकाच्या रोगप्रतिकारक शक्तीवर वाईट परिणाम होतो. गुळवेलीमधील इम्युनोमॉड्युलेटरी गुणधर्मामुळे रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते.
रक्तपेशी वाढतात
डेंग्यू आजारावर गुळवेल रामबाण उपाय आहे. डेंग्यूमुळे रुग्णाच्या शरीरातील प्लेटलेट कमी होतात. यामुळे मृत्यू ओढवण्याचीही शक्यता असते. गुळवेलीतील पोषक घटकांमुळे शरीरातील रक्तपेशींची संख्या वाढण्यास मदत मिळते. गुळवेलीमुळे पचनाशी संबंधित असलेल्या समस्याही कमी होतात. जुलाब, अतिसार आदी समस्यांपासून सुटका होते. गुळवेलीमुळे पचनप्रक्रिया मजबूत होते. पचनक्रिया सुरळीत सुरू असल्यास कित्येक आजारांचा धोका टळतो.
मधुमेह
रक्तातील वाढणारी शर्करा नियंत्रित ठेवण्याचे कार्य गुळवेल करते. गुळवेलीमुळे मधुमेहासारखे घातक आजार धोका कमी होतो. बदलती जीवनशैली, धावपळीमुळे आरोग्यावर हानिकारक परिणाम होतात. आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गुळवेलचे सेवन करावे. यामुळे रक्तदाब आणि पचनाशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत मिळते. ताप उतरवणे, हाडांच्या वेदना कमी करणे यासह कित्येक शारीरिक त्रासातून गुळवेलीमुळे आपली सुटका होते. या वनस्पतीला अमृतवेल असेही म्हटले जाते. वात, तापानंतर येणारा अशक्तपणा, भूक न लागणे, रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होणे इत्यादी समस्यांवर उपाय म्हणून गुळवेलीचे सेवन करावे.
सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी मोहीम
गुळवेलीस तिच्या उपयुक्ततेमुळे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याकरिता राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, केंद्रीय आयुष मंत्रालय यांनी ‘अमृता फॉर लाईफ’ ही मोहीम सुरू केली आहे. या प्रकल्पांतर्गत अंजनगाव सुर्जी परिसरातील लोकांना गुळवेलीची माहिती मिळावी, याकरिता श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मंगेश डगवाल हे कार्य करीत आहेत. या प्रकल्पांतर्गत गुळवेलीची रोपे तयार करून या परिसरातील लोकांना मोफत वाटून त्याच्या उपयोग व लागवडी बदलची जनजागृती करण्यात येणार आहे.