लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महिनाभरापूर्वी आई-वडिलांचे निधन झाले. त्यांच्या उपचारात तजवीज संपली. तीन एकरांतील सोयाबीनवर आशा असताना परतीच्या पावसाने तेही मातीमोल झाले. आतापर्यंतच्या संघर्षावर नैराश्याने मात केल्याने शेतकºयाने मृत्यूला कवटाळल्याची घटना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सिद्धनाथपूर येथे बुधवारी घडली. गुरुवारी दुपारी नातेवाइकांनी मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणला व उद्ध्वस्त खरिपाचा हा बळी असल्याचा आरोप करीत आर्थिक मदतीची मागणी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.सुधाकर महादेवराव पाटेकर (४७) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे. ते नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सिद्धनाथपूर येथील रहिवासी आहेत. बुधवारी दुपारी २ च्या सुमारास त्यांनी विष प्राशन केले. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले गेले. रात्री २ वाजता त्यांना मृत्यू झाला. सुधाकर पाटेकर यांच्या वडिलांना कर्करोग होता. त्यांनी आजारपणाला कंटाळून महिनाभरापूर्वी आत्महत्या केली. आई विमल पाटेकर यांचादेखील याच कालावधीत मृत्यू झाला. वडिलांचे आजारपण ते मृत्यू व नंतरचे सोपस्कार यामध्ये सुधाकर पाटेकर यांचा खर्च झाला. सततच्या नापिकीमुळे आर्थिक संकटात असलेल्या सुधाकर यांनी दोन लाखांचे कर्ज नातेवाइकांजवळून घेतले. महाराष्ट्र बँक व गावातील सेवा सहकारी सोसायटीचे पीक कर्ज आधीच डोक्यावर कायम आहे. अशा विपरीत परिस्थितीत अवकाळी पावसाने सोयाबीनचे मातेरे झाले. त्यामुळे सुधाकर यांचा धीर खचला व जगाव कसं, या विवंचनेत त्यांनी शेतात विषारी औषधाचे सेवन करून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली व मुलगा आहे. त्यांचे भाऊ संतोष पाटेकर, जावई देविदास खाडे, शेजारी प्रशांत भागेवार, मोहन पवार, विजय पाटेकर आदींनी त्यांचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणला व अप्पर जिल्हाधिकारी संजय पवार यांना निवेदन देऊन तत्काळ आर्थिक मदतीची मागणी केली. यावेळी पवार यांनी शासकीय निकषानुसार देय रक्कम देण्यात येईल, असे आश्वासन दिले.अपर जिल्हाधिकाºयांचे चौकशीचे आदेशपरतीच्या दहा दिवसांच्या पावसाने सुधाकर पाटेकर यांच्या तीन एकरातील सोयाबीन मातीमोल झाले. बाधित क्षेत्राचे अद्याप पंचनामे करण्यात न आल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला. यावर अप्पर जिल्हाधिकारी संजय पवार यांनी हा आरोप फेटाळत याविषयी तत्काळ चौकशीचे आदेश उपजिल्हाधिकारी (महसूल) स्रेहल कनिचे यांना दिले. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसाला मदत मिळावी याविषयी सकारात्मक अहवाल देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.कृषिसमृद्ध पट्ट्यावर निसर्गाची अवकळानांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी ते धनज (बु.) या मार्गावर असलेल्या गावांना काळी माती, भरपूर भूअतंर्गत पाणी व बेंबळा नदीच्या पृष्ठभूमीमुळे समृद्धीचा वारसा लाभला आहे. तथापि, या वारशाला निसर्गानेच दृष्ट लावली आहे. गेल्या चार वर्षांपासून सातत्याने नापिकी होत आहे. यात या परिसरातील शेतकरी कसाबसा तरून गेला. तथापि, यंदा परतीच्या पावसाने शेतीचे होत्याचे नव्हते केले. जोडीला असलेली प्रशासकीय अनास्था शेतकºयांना हवालदिल करून गेली आहे.पंचनाम्यात नाव आहे किंवा नाही, याषियी खात्री करण्याचे निर्देश दिले. मृत शेतकºयाच्या कुटुंबास निकषानुसार मदत मिळेल. याविषयी सकारात्मक अहवाल देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.- संजय पवारअप्पर जिल्हाधिकारी
शेतकऱ्याची आत्महत्या; मृतदेह कलेक्ट्रेटमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 6:00 AM
सुधाकर महादेवराव पाटेकर (४७) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे. ते नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सिद्धनाथपूर येथील रहिवासी आहेत. बुधवारी दुपारी २ च्या सुमारास त्यांनी विष प्राशन केले. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले गेले. रात्री २ वाजता त्यांना मृत्यू झाला. सुधाकर पाटेकर यांच्या वडिलांना कर्करोग होता. त्यांनी आजारपणाला कंटाळून महिनाभरापूर्वी आत्महत्या केली.
ठळक मुद्देनांदगाव तालुक्यात उद्ध्वस्त खरिपाचा बळी : हातातोंडाचा घास निसर्गाने हिरावला; पंचनामे झाले नसल्याचा नातेवाईकांचा आरोप