कळमगव्हाण येथे शेतकरी प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:14 AM2021-02-16T04:14:29+5:302021-02-16T04:14:29+5:30
टाकरखेडा संभू : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान सन २०२०-२१ अंतर्गत भातकुली तालुक्यातील मौजा कळमगव्हाण येथे सलीम खान न्यामद खान ...
टाकरखेडा संभू : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान सन २०२०-२१ अंतर्गत भातकुली तालुक्यातील मौजा कळमगव्हाण येथे सलीम खान न्यामद खान पठाण यांच्या शेतात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत जमीन आरोग्यपत्रिका शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षणात कृषी विद्यापीठाच्या अमरावती येथील प्रक्षेत्राचे अधिकारी राजेंद्र जाणे यांनी माती प्रशिक्षणाच्या आधारावर पिकांचे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, सेंद्रिय कर्ब, जमिनीचा सामू, जमिनीमध्ये उपलब्ध नत्र स्फुरद व पालाश व सूक्ष्म मूलद्रव्यांची मात्रा, गावाच्या सुपीकता निर्देशांकानुसार द्यायची खतमात्रा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी प्रभारी तालुका कृषी अधिकारी ए.आर. जाधव यांनी सोयाबीन बियाणे साठवणूक, उन्हाळी सोयाबीन उत्पादन, कपाशी फरदड निर्मूलन याबाबत माहिती दिली. पंचायत समिती सदस्य उषा बोंडे, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत बोंडे, राजू राहाटे, प्रदीप गौरखेडे, दीपाली बिजवे, सुनीता चव्हाण, निकिता रोंघे, रोहिणी माहोरे, डॉ. आर.जी. राहाटे, रमेश बोंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कृषी पर्यवेक्षक हेमंत इंगळे, कृषी सहायक स्वाती तायडे, अतुल सोळंके, रूपाली ठाकरे, आशिष तायडे, विलास कराळे, शेती शाळा प्रशिक्षक अमरीश खेडेकर व प्रतीक वानखडे, कृषिमित्र नीलेश रोंघे आदींनी परिश्रम घेतले.