अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:13 AM2020-12-24T04:13:18+5:302020-12-24T04:13:18+5:30

सर्वेक्षण यादीतून नावे गहाळ, काजना, राजना येथील शेतकऱ्यांनी मांडली व्यथा नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील राजना, काजना गावच्या परिसरात ...

Farmers affected by heavy rains are deprived of assistance | अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित

अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित

Next

सर्वेक्षण यादीतून नावे गहाळ, काजना, राजना येथील शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील राजना, काजना गावच्या परिसरात २२

जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनी पिकांसह खरडून गेल्या होत्या. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. सर्वेक्षण यादीतून बरीच नावे सुटल्याने शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहिले असल्याची तक्रार राजना, काजना गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या नाल्यालगतच्या शेतजमिनी खरडून शेतात पाणी साचले होते. पेरणी केलेले सोयाबीन, कापूस, तूर ही पिके ही उद्ध्वस्त झाली होती. येथील बऱ्याच शेतकऱ्यांचा नुकसान भरपाईच्या सर्वेक्षणाच्या यादीमध्ये नावाचा समावेश नाही. या बाबीची चौकशी करून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, या मागणीचे निवेदन तहसीलदारांना विलास बोरकर व सचिन रिठे यांच्यासमवेत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने दिले.

निर्मला बोरकर,विलास बोरकर, दीपक बोरकर, तुषार बोरकर, किरण बोरकर, विनय बोरकर, दिलीप बोरकर, अमोल सरोदे, तुळशीराम सरोदे, श्रीराम सरोदे, मधुकर मोळागे, महादेवराव बोरकर, संतोष पाटेकर, वेणूताई बोरकर, अनंता बोरकर, कांताबाई बोरकर, रंगराव काललकर, अमोल बोरकर, अनुसया काललकर, ओंकार निंघोट, आशिष बोरकर, गोवर्धन बोरकर, गजानन घरडे, राजू बोरकर,हरेश बोरकर, तुकाराम हंबर्डे, उषाताई बोरकर, पांडुरंग पाटेकर, सारिकला बोरकर, अनुज बोरकर, पूजा बोरकर आदी याप्रसंगी उपस्थित होते.

Web Title: Farmers affected by heavy rains are deprived of assistance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.