शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:17 AM2021-06-16T04:17:09+5:302021-06-16T04:17:09+5:30
येवदा : अपुऱ्या ओलाव्यावर बियाणे जाईल वाया जाण्यापासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले ...
येवदा : अपुऱ्या ओलाव्यावर बियाणे जाईल वाया जाण्यापासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. परंतु, तो सर्वदूर सारख्या प्रमाणात नसून, कोकण सोडून इतर ठिकाणी तुरळक पाऊस कोसळत आहे. सोयाबीन, तूर, भुईमूग व मका या पिकांच्या नियोजनाकरिता पेरणीची पूर्वतयारीची कामे करावीत. विदर्भामध्ये भात पिकासाठी रोपवाटिकांची पूर्वतयारी चालू ठेवावी. खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार मशागतीची कामे करावीत. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका या खरीप पीक पेरणीसाठी शेतजमीन नांगरणी करून वखराच्या पाळ्या द्याव्या. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तग धरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.