गणेश देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्ककधी नव्हे ती सर्वांनी एकजूट करून मला हरविण्याचा प्रयत्न केला असला तरी बडनेºयाच्या जनतेनेच तिसऱ्यांदा विधानसभेत पाठविले. जनतेच्या या विश्वासाचे ऋण बडनेरा मतदारसंघाचा बारामतीसम विकास करून फेडणार असल्याच्या भावना आमदार रवि राणा यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केल्या. खासदार नवनीत राणा यादेखील चर्चेदरम्यान उपस्थित होत्या.आमदार राणा यांनी विधानसभा निवडणुकीत तिसºयांदा विजय संपादन करून नवा विक्रम घडविला. बडनेरा मतदारसंघाच्या स्थापनेपासून यापूर्वी कुणीही सलग तीनवेळा निवडून आले नव्हते. आमदार रवि राणा यांच्या जोडीला खासदार नवनीत राणा यादेखील असल्यामुळे त्यांच्याकडून विकासाच्या शक्यता वाढल्या आहेत. पती अपक्ष आमदार आणि पत्नी अपक्ष खासदार असलेले देशभरातील हे एकमेव जोडपे ठरले आहे.शेतकºयांसाठी बडनेरा मतदारसंघात थेट शेतमाल विक्रीसाठीचे संकुल निर्माण करण्याचा निर्धार आमदार राणा यांनी व्यक्त केला. भाजीपाला आणि इतर शेतमालासोबतच पानउत्पादक शेतकºयांकरिता पानविक्रीसाठीचे नवे दालन उघडण्याची योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बडनेरा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पानांचे उत्पादन केले जाते. त्यांना गतवैभव प्राप्त व्हावे, हा त्यामागे उद्देश असल्याचे ते म्हणाले.रखडलेले विमानतळ, वॅगन निर्मिती केंद्र लवकरच पूर्ण केले जाईल. रेल्वे जंक्शन असलेल्या बडनेºयात मॉडेल रेल्वे स्टेशन आणि वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती केली जाईल. जिल्हाभरातील महिलांसाठी केवळ महिलाच कर्मचारी आणि अधिकारी असलेले पोलीस ठाणे निर्माण करूया. महिला, मुलींचा सन्मान राखला जावा, त्या सुरक्षित असाव्यात, त्यांच्यावर कुणी अन्याय केलाच, तर त्याच्या मुसक्या आवळण्याचे काम संवेदनशीलपणे व्हावे, यासाठी हे महिला पोलीस ठाणे महत्त्वाची भूमिका निभावेल, असा विश्वास आमदार-खासदार राणा दाम्पत्याने व्यक्त केला. भातकुली तहसील कार्यालय भातकुली शहरात स्थलांतरित करण्याच्या निर्णयाची अंंमलबजावणी तीन महिन्यांत केली जाईल, असे ठासून सांगताना अचलपूर जिल्ह्याच्या निर्मितीची प्रक्रिया नजीकच्या काळात आरंभली जाईल, या वचनाची स्वत:च आठवण करून देण्यासही ते विसरले नाहीत.शिवसेना, भाजप, काही स्थानिक नेते यांनी एकत्र येऊन मला हरविण्याचा संकल्प सोडला होता. परंतु, जनतेने माझी साथ सोडली नाही. विकास हाच आमचा ध्यास असल्याचे पुनरुद्गार राणा दाम्पत्याने काढले.
शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत - रवि राणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 5:00 AM
आमदार राणा यांनी विधानसभा निवडणुकीत तिसºयांदा विजय संपादन करून नवा विक्रम घडविला. बडनेरा मतदारसंघाच्या स्थापनेपासून यापूर्वी कुणीही सलग तीनवेळा निवडून आले नव्हते. आमदार रवि राणा यांच्या जोडीला खासदार नवनीत राणा यादेखील असल्यामुळे त्यांच्याकडून विकासाच्या शक्यता वाढल्या आहेत. पती अपक्ष आमदार आणि पत्नी अपक्ष खासदार असलेले देशभरातील हे एकमेव जोडपे ठरले आहे.
ठळक मुद्देअचलपूर जिल्ह्याची निर्मितीही : भातकुलीत तीन महिन्यांत तहसील कार्यालय