शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात, भावात सहा हजारांनी घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:15 AM2021-09-23T04:15:08+5:302021-09-23T04:15:08+5:30
खाद्यतेलाचे आयात शुल्कात कमी केंद्र शासनाने खाद्यतेलाचे आयात शुल्क २५ टक्क्यांपर्यंत कमी केलेले आहे. त्यामुळे काही प्रमाणात सोयाबीनचे तेलाच्या ...
खाद्यतेलाचे आयात शुल्कात कमी
केंद्र शासनाने खाद्यतेलाचे आयात शुल्क २५ टक्क्यांपर्यंत कमी केलेले आहे. त्यामुळे काही प्रमाणात सोयाबीनचे तेलाच्या दरात कमी आलेली आहे. याशिवाय सोयाबीनचे डीओसीला आयातीची परवानगी डिसेंबरपर्यंत दिलेली आहे. यामुळे सोयाबीनचे दरात सप्टेंबरपासून कमी यायला सुरुवात झालेली आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात दरात कमी येत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
बॉक्स :जिल्हातील बहुतांश प्लँट बंदच
सध्या जिल्हा व परिसरातील एक, दोन प्लँट सद्य:स्थितीत सुरू आहेत, बहुतांश प्लँट सध्या बंद आहेत. त्यामुळेही सोयाबीनची मागणी कमी आहे. प्लँटमध्ये क्विंटलमागे १७ ते१८ किलो तेल निघते, त्यातुलनेत ७५ ते ८० किलो डीओसी तयार होते व या डीओसीला सध्या उठाव नाही, भारतात फक्त पोल्ट्री उद्योगातच याचा वापर होतो, विदेशात मात्र, अन्य काही प्रकारात डीओसी वापरल्या जात असल्याचे सांगण्यात आले.
कोट :या महिन्यात सोयाबीनचे भावात कमी आलेली आहे. याला केंद्र शासनाचे आयात धोरण कारणीभूत आहे. तेलासह सोयाबीन ढेपेसाठी आयात शुल्कात कमी केली व मुदत वाढविलेली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्राने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.
नाना नागमोते
उपसभापती, अमरावती बाजार समिती.
कोट : शासनाने तेलासह सोयाबीन डीओसीसाठी आयात शुल्कात कमी केलेली आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झालेली आहे. बहुतांश प्लँट देखील सुरू व्हायचे आहेत व नव्या सोयाबीनमध्ये माईश्चर असल्याने दरात कमी येत आहे.
अमर बांबल
अडते, अमरावती बाजार समिती.