लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या नामवंत महिलेविषयी बदनामीकारक कमेंट टाकणाºया राहुल भोईर नावाच्या फेसबुकधारकाने माफी मागून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायबर पोलिसांनी त्या फेसबुक धारकाविरुद्ध गुन्हा नोंदविल्याने आता माफी मागून उपयोग होणार तरी कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरातील नामवंत सामाजिक महिला कार्यकर्तीने लक्ष्मीपूजनाचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले होते. त्या छायाचित्रावर अनेकांनी चांगल्या पद्धतीने कमेंट केल्या. मात्र, सरकारनामा फेसबुक पेजवर अपलोड असलेल्या छायाचित्राखाली राहुल भोईर नावाच्या फेसबुकधारकाने अश्लील कमेंट केल्याचे निदर्शनास आले. ही बाब महिलांसाठी लज्जास्पद असून, बदनामीकारक ठरली. या गंभीर प्रकाराची तक्रार महिलेने मंगळवारी सायबर पोलीस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी https://www. facebook.com/shivanshbhoir या फेसबुकच्या खातेधारकांविरुद्ध भादंविच्या कलम ३५४(अ), ५०० व ६७ आयटी अॅक्टनुसार गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी तपासकार्य सुरू असून, आरोपी फेसबुकधारकाची माहिती फेसबुक कार्पोरेशनला मागिवली आहे. ती माहिती मिळाल्यानंतर संबंधित फेसबुकधारकाविरुद्ध अटकेची कारवाई केली जाणार आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती वाºयासारखी शहरात पसरली असून, ही माहिती संब्ंधित राहुल भोईर नामक फेसबुकधारकापर्यंत पोहोचली असावी. बुधवारी सायबर पोलिसांनी संबंधित वेबपोर्टलवर नजर टाकली असता, आरोपी फेसबुकधारकाने चूक झाल्याची कबुली देऊन माफी मागितल्याचा संदेश पाठविला आहे. राहुल भोईर हा एका राजकीय पक्षाशी जुळलेला असून, अशा व्यक्तीकडून अशाप्रकारचे कमेंट करण्यात आल्याची माहिती निंदनीय असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
गुन्हा दाखल, राहुलची सारवासारव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 11:14 PM
सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या नामवंत महिलेविषयी बदनामीकारक कमेंट टाकणाºया राहुल भोईर नावाच्या फेसबुकधारकाने माफी मागून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायबर पोलिसांनी त्या फेसबुक धारकाविरुद्ध गुन्हा नोंदविल्याने आता माफी मागून उपयोग होणार तरी कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ठळक मुद्देफेसबुकच्या माहितीनंतर होईल अटक : सायबर पोलिसांचे फेसबुक कार्पोरेशनला पत्र