अमरावती - धारणी शहरातील बस स्थानकालगत सर्व्हे नंबर १२६ या भूखंडावर दुकानांना लागलेल्या आगीत १५ दुकाने जळून खाक झाली. शुक्रवारी पहाटे ४ वाजता लागलेली आग सकाळी ९ वाजता शांत झाली. यामध्ये कापड दुकान, मेडकिल स्टोअर, चप्पल दुकान, हॉटेल आदी प्रतिष्ठानांतून कोट्यवधीचे नुकसान झाले. धारणी, चिखलदरा, ब-हाणपूर, खंडवा, अचलपूर येथून अग्निशामक बंब मागविण्यात आले होते. याशिवाय स्थानिक १० ते १२ टँकरने आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला. धारणी पोलीस, नगरपंचायतचे अधिकारी व तहसील प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते. सध्याही त्यातील लाकूड फाटा जळतच आहे. यापूर्वी १९९३ मध्ये येथे एवढी मोठी आग लागली होती.
१०० मीटर अंतरावर होता भारत पेट्रोलियमचा पंपदुकानाना आग लागली त्याच परिसरात अवघ्या १०० मीटर अंतरावर मुख्य महामार्गावर भारत पेट्रोलियमचा पंप आहे. आग विझविण्यात अपयश आले असते, तर पेट्रोल पंपापर्यंत आग पोहचली असती.