शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
2
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?
3
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
4
Srishti Tuli : "मी गळफास घेत आहे"; महिला पायलटने आत्महत्येआधी बॉयफ्रेंडला केलेला Video कॉल
5
PMJAY-Scam : पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोठी फसवणूक! पैसे कमावण्यासाठी १८ वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी!
6
महत्त्वाच्या खात्यांसाठी महायुतीत लॉबिंग; शिंदेसेना, अजित पवारांना कुठली खाती हवीत?
7
नाना पटोले संघाचे हस्तक, त्यांना RSS मध्येच पाठवा, काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराचा गंभीर आरोप  
8
Raj Kundra BREAKING: राज कुंद्राच्या घरी ईडीचे धाडसत्र, कार्यालयातही झाडाझडती
9
भांडुपच्या शाळेत बदलापूरची पुनरावृत्ती! शाळेच्या तळघरात तीन मुलींची विनयभंग, आरोपीला अटक
10
ICC Champions Trophy संदर्भात फायनली काय ठरणार ते आज तरी कळणार का?
11
मला पक्षाचं चिन्ह मिळालं पण...; काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप
12
Astrology Tips: सलग १० शुक्रवार करा 'हे' उपाय; लक्ष्मी घरातून काढणार नाही पाय!
13
"या चांडाळामुळे.…’’, काका पशुपती पारस यांची चिराग पासवान यांच्यावर बोचरी टीका  
14
लग्नानंतर ५ व्या दिवशी मृत्यूने गाठलं, नववधूसोबत आक्रित घडलं; आंघोळीला बाथरुममध्ये गेली अन्...
15
Astro Tip: कोणत्या गोष्टी केल्या असता घरात असलेली लक्ष्मी स्थिर राहते? जाणून घ्या!
16
आयुष्याची नवी सुरुवात! 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे अडकली लग्नबंधनात, फोटो आले समोर
17
दुसऱ्या पत्नीला प्रॉपर्टीत अधिकार मिळतो का? पतीच्या मालमत्तेचे खरे वारसदार कोण? काय आहे कायदा?
18
Adani Group Stocks: 'या' सेगमेंटमध्ये अदानींच्या शेअर्सची एन्ट्री; ३ शेअर्सनं पकडला तुफान स्पीड, तुमच्याकडे आहे का?
19
"लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी अमेरिका..."; शार्प शूटरचा खळबळजनक खुलासा
20
नाना पाटेकरांना कशाची भीती वाटते? म्हणाले, "ना मृत्यूची ना कोणा व्यक्तीची पण...."

‘सरपंच अवॉर्ड’साठी राज्यातून पाच हजार नामांकने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:23 AM

संपूर्ण राज्य आणि प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’साठी राज्यभरातून पाच हजार सरपंचांची नामांकने दाखल झाली आहेत.

ठळक मुद्देज्युरी निवडणार आज आदर्श सरपंच : २२ फेब्रुवारीला होणार अमरावती जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा

अमरावती : संपूर्ण राज्य आणि प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’साठी राज्यभरातून पाच हजार सरपंचांची नामांकने दाखल झाली आहेत. ‘लोकमत’चे प्रत्येक जिल्हा पातळीवरील ज्युरी मंडळ या नामांकनातून संबंधित जिल्ह्यातील आदर्श सरपंचांची निवड करणार आहे. गुरुवार २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता अमरावती जिल्हा पातळीवरील सोहळा संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती येथे होणार आहे.गावखेड्यांच्या बदलाची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभाऱ्यांना ‘बीकेटी टायर्स प्रस्तुत लोकमत सरपंच अवॉर्ड २०१७’ने गौरविण्याचा निर्णय ‘लोकमत’ने घेतला आहे. गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या सरपंचांना वैयक्तिक पातळीवर गौरविणारा हा पहिलाच पुरस्कार आहे. ‘पतंजली आयुर्वेद’ हे या उपक्रमाचे प्रायोजक तर ‘महिंद्रा ट्रॅक्टर्स’ हे सहप्रायोजक आहेत.पहिल्याच वर्षी या पुरस्कारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. अवघ्या अठरा जिल्ह्यांतून पाच हजार सरपंचांची नामांकने दाखल झाली आहेत. जनतेनेही उत्स्फूर्तपणे सरपंचांची नामांकने दाखल केली आहेत.सदर पुरस्कारांबाबत प्रचंड चुरस व उत्सुकता आहे. सरपंचांनी गावातील जल, बीज व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण, प्रशासन-लोकसहभाग, रोजगार, कृषी या ११ कॅटेगरीत केलेल्या कामांची पाहणी करुन या प्रत्येक क्षेत्रासाठी पुरस्कार दिला जाणार आहे. याशिवाय ‘उद्योन्मुख नेतृत्व’ व सर्वांगीण काम करणाºया सरपंचासाठी ‘सरपंच आॅफ द ईयर’ असे दोन स्वतंत्र पुरस्कार आहेत. असे एकूण १३ पुरस्कार देण्यात येतील. सुरुवातीला जिल्हा पातळीवर हे पुरस्कार दिले जाणार आहे. त्यानंतर या विजेत्यांचे राज्य पातळीसाठी नामांकन करण्यात येणार आहे. त्यातून राज्यातील आदर्श सरपंच ठरतील. राज्यात कोण आदर्श ठरणार? याची ग्रामीण महाराष्ट्राला प्रचंड उत्सुकता आहे.जिल्हास्तरावरील पुरस्कारांची निवड करण्यासाठी ‘लोकमत’ने समाजातील तज्ज्ञ व्यक्तींचे निरपेक्ष ज्युरी मंडळ स्थापन केले आहे. या ज्युरींमार्फत प्रत्येक नामांकनाची छाननी होऊन विजेत्यांवर मोहर उमटवली जाणार आहे. त्यामुळे विजेते कोण राहणार ? हे सोहळ्यातच स्पष्ट होणार आहे. राज्यासाठी ही स्वतंत्र्य ज्युरी मंडळ असेल.पुरस्कारांसाठीचे जिल्हेअकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, औरंगाबाद, लातूर, रायगड, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांत यावर्षी हे पुरस्कार सुरू करण्यात आले आहे.पार्लमेंट ते पंचायत‘लोकमत’ने आदर्श खासदारांनी गौरविण्यासाठी पार्लमेंटरी अ‍ॅवॉर्ड सुरू केले आहेत. अशा प्रकारचा पुरस्कार सुरू करणारा ‘लोकमत’ हा पहिला माध्यम समूह ठरला आहे. संसद ते गाव हा प्रवास करीत ‘लोकमत’ आता सरपंचांनाही गौरवित आहे. राज्यात जनतेने या पुरस्काराचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे.सोहळ्यात होणार मंथनसरपंच अवॉर्डच्या जिल्हापातळीवरील सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. ग्रामविकास व पंचायतराजबाबत महत्त्वपूर्ण मंथन या सोहळ्यात घडणार आहे. जिल्हाभरातून सरपंच या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.जिल्ह्यातून ३१९ नामांकनेया पुरस्कार योजनेत अमरावती जिल्ह्यातून ३१९ नामांकने दाखल झाली आहेत. या नामांकनात नामवंत ग्रामपंचायतींसह दुर्गम भागातील सरपंचांच्या नामांकनांचाही सहभाग आहे. यानिमित्ताने अनेक नवख्या गावांच्या यशोगाथाही समोर येणार आहे.'लोकमत' माध्यम नेहमी अभिनव तसेच आकांक्षात्मक संकल्पना राबविण्यात पुढाकार घेत आहे. महाराष्ट्रातील धोरणकर्ते, लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ दि इयर कार्यक्रमातील सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व ते तळागाळात जे हिंमतीने काम करतात, अशा सर्वस्तरापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. ग्राम पातळीवर ज्यांनी उल्लेखनीय, दिशादर्शक काम केले आहे, अशा सरपंचांना गौरविण्यात आनंद होत आहे. एक जबाबदार माध्यम म्हणून 'लोकमत' नेहमीच आपले कर्तव्य बजावत आहे.- विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूहलोकमत सरपंच पुरस्कारासाठी राज्यभरातून मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून आनंद झाला. असा अभूतपूर्व कार्यक्रम घेण्यात बीकेटी टायर्सला आनंद होत आहे. 'बीकेटी टायर्स मीडिया प्रमोशन आणि रोड शो' यांचाही आम्हाला चांगला फायदा झाला आहे. आमच्या जागतिक दर्जाच्या उत्पादनांमध्ये लोकांची रुची वाढत आहे..- झुबेर शेख, एरिया मॅनेजर (अ‍ॅग्री सेल्स) महाराष्ट्र, बीकेटी टायर्सभारतीय ट्रॅक्टर उद्योगात निर्विवाद नेता म्हणून आम्ही नेहमी कृषी उत्पादकता आणि ग्रामीण समृद्धी वाढविण्यासाठी नवीन कृषी तंत्रज्ञान विकसित केले. ते शेतकºयांपर्यंत पोहोचविले. शेतकऱ्यांशी असलेले आमचे नाते अधिक दृढ करण्यासाठी आम्ही लोकमतसोबत सरपंच पुरस्कार देण्यासाठी सहभाग घेतला आहे..- रवींद्र शहाणे, उपाध्यक्ष (पणन),महिंद्रा फार्म डिव्हिजन