पतंग उडवा,पण वीजवाहिन्यांपासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:11 AM2021-01-14T04:11:42+5:302021-01-14T04:11:42+5:30

अमरावती : मकरसंक्रांतीनिमित्त सर्वत्र पतंग उडविली जातात. त्या पार्श्वभूमीवर पतंग उडवा, पण वीजवाहिन्यांपासून दूर, असे आवाहन महावितरणने केले ...

Fly the kite, but away from the power lines | पतंग उडवा,पण वीजवाहिन्यांपासून दूर

पतंग उडवा,पण वीजवाहिन्यांपासून दूर

Next

अमरावती : मकरसंक्रांतीनिमित्त सर्वत्र पतंग उडविली जातात. त्या पार्श्वभूमीवर पतंग उडवा, पण वीजवाहिन्यांपासून दूर, असे आवाहन महावितरणने केले आहे. पतंगबाजी दरम्यान वीजवाहिन्यांवर मांजा अडल्यास किंवा अनावधानाने पतंगबाज वीजवाहिन्यांच्या संपर्कात आल्यास जिवितहानीबरोबरच वित्तहानी होण्याचा धोका आहे. त्यामुळे पतंग उडविताना सर्तक रहा, असे महावितरणे स्पष्ट केले. महापारेषणच्या उच्चदाब वीजवाहिन्यांचे जाळे हजारो किलोमीटरचे असून महावितरणच्या लघु व मध्यम वीजवाहिन्यांचे जाळेही मोठ्या प्रमाणात आहे. खांबावरून टाकलेल्या वीज वाहिन्यांतून वीजप्रवाह सुरू असतो. त्यामुळे वीज वाहिन्यांच्या परिसरात पतंग उडविताना अनेकदा मांजा, पतंग वीज वाहिन्यांना अडकण्याचे प्रकार घडतात, सदर पतंग काढण्यासाठी मुलांसह नागरिकांकडून लोखंडी रॉड, पाईप किंवा लांब तारेचा वापर केला जातो. त्यावेळी वीजपुरवठा सुरू असेल तर विजेचा धक्का बसून जिवितहानी होते. तसेच वाहिन्यांवर अडकलेला मांजा खेचल्यास वीजवाहिन्या एकमेकांच्या संपर्कात येऊ, आग लागणे, वीजपुरवठा खंडित होणे, अशा घटना घडतात. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पतंग उडविताना विशेष काळजी घ्यावी, वीजवाहिन्यांवर अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

बॉक्स

मोकळ्या मैदानात पतंग उडवा

पतंग उडवण्यासाठी तरुणांनी वीजवाहिन्या किंवा गच्चीवरून पतंग उडविण्याऐवजी मोकळ्या मैदानात पतंगबाजीचा आनंद घ्यावा, आपण पतंगबाजीचा आनंद लुटताना इतरांची गैरसोय होऊ नये याचीही जाणीव ठेवावी, असेही महावितरणने म्हटले आहे.

Web Title: Fly the kite, but away from the power lines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.