सुमारे ३ लाख रुपयांमध्ये लग्न ठरल्यानंतर व ते पार पडल्यानंतर स्वत:च्या १६ वर्षीय मुलीला घेऊन तिची आई अहमदाबाद येथून अमरावतीला परतली. वरपक्षाला त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची बतावणी करण्यात आली. पिडिता अमरावतीत पोहोचल्यानंतर तिला आसेगाव येथे पाच दिवस डांबण्यात आले. मात्र, ती सावत्र वडिलाच्या हाती लागली. पुन्हा तिला अमरावती येथील एका घरात डांबण्यात आले. तेथून तिने स्वत:ची सुटका करवून घेत, ओळखीतील एका घरी आश्रय घेतला. तेथून गाडगेनगर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. दरम्यान, मुलीला अमरावतीत सोडून तिची आई पुन्हा अहमदाबादला गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, १२ जुलै रोजी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार याच सावत्र वडिलाने गाडगेनगर पोलिसांत नोंदविली होती. त्यामुळे या प्रकरणात त्याचा नेमका रोल काय, याची चौकशी पोलीस कोठडीदरम्यान केली जाणार आहे.
कोट
पिडिता अहमदाबादहून परतल्यानंतर तिला आसेगाव व अमरावती येथे डांबण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी तिच्या सावत्र वडिलाला अटक केली. न्यायालयाने त्याला २६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पिडिताची आई अहमदाबादला असल्याचे समजले.
रेखा लोंढे, पोलीस निरिक्षक
गाडगेनगर