मोझरी बसस्थानक परिसरात वृक्षारोपणाचा पायंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:11 AM2021-07-21T04:11:03+5:302021-07-21T04:11:03+5:30

'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीद वाक्य ठेऊन जन सेवेचे हित जोपासणाऱ्या एसटी महामंडळाच्या मोझरी बसस्थानकावर यंदा पावसाळ्याच्या सुरवातीलाच वृक्षारोपण पार ...

Foundation of tree planting in Mozari bus stand area | मोझरी बसस्थानक परिसरात वृक्षारोपणाचा पायंडा

मोझरी बसस्थानक परिसरात वृक्षारोपणाचा पायंडा

Next

'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीद वाक्य ठेऊन जन सेवेचे हित जोपासणाऱ्या एसटी महामंडळाच्या मोझरी बसस्थानकावर यंदा पावसाळ्याच्या सुरवातीलाच वृक्षारोपण पार पडले. सदा सर्वदा अग्रस्थानी राहत स्वच्छतेला प्राधान्यक्रम देणाऱ्या मोझरी बसस्थानक परिसरात यंदाच्या पावसाळ्यात वृक्षारोपण करण्याचे दिशा निर्देश विभाग नियंत्रक श्रीकांत गभने, आगार व्यवस्थापन संदीप खवडे ,शैलेश गवई आदी अधिकाऱ्यांकडून देण्यात आले होते.सोबतच त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमि मधील बसस्थानक अधिक सुविधा संपन्न व स्वच्छ व भयमुक्त राहावा यासाठी सातत्याने वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.त्यातूनच वृक्षारोपणासारखा समाजोपयोगी उपक्रम यंदा राबविण्याचा पायंडा डेपो नियंत्रण प्रमोद वाईनदेकर यांनी पाडला.दिवसभर प्रवाशी ग्रामस्थांच्या समस्या समाधान करण्याकडे त्यांनी जातीने लक्ष दिले. रात्रीच्या वेळी अकस्मात हजेरी लावून अनेकदा बसस्थानक परिसरात जाऊन विनाकारण फिरणाऱ्याना समज दिला.त्यामुळे आधीच्या तुलनेत विद्यार्थी, विद्याथिनी, महिलावर्ग च्या दृष्टीने हा परिसर अधिक सुरक्षित झाला आहे.या बसस्थानक परिसरातून दररोज शेकडो प्रवाशी शहराच्या व ग्रामीण भागात प्रवास करतात.जिह्यातील ग्रामीण भागातील सर्वात देखणं बसस्थानक मोझरीला लाभले आहे हे विशेष

Web Title: Foundation of tree planting in Mozari bus stand area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.