तीन टक्के पॉझिटिव्हचा मुक्त संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:13 AM2021-03-27T04:13:07+5:302021-03-27T04:13:07+5:30
अमरावती : या आठवड्यात चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हिटी ४० वरून ७ टक्क्यांवर आल्याने जिल्ह्याला दिलासा असताना रॅण्डम सर्व्हेत तीन टक्के अधिकारी ...
अमरावती : या आठवड्यात चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हिटी ४० वरून ७ टक्क्यांवर आल्याने जिल्ह्याला दिलासा असताना रॅण्डम सर्व्हेत तीन टक्के अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले व यांचा सर्वत्र मुक्त संचार असल्याने कसा रोखणार कोरोना, हा प्रश्न जिल्हा व आरोग्य यंत्रणेसमोर उभा ठाकला आहे.
राज्य सेवा पूर्वपरीक्षेसाठी जिल्ह्यातील विविध विभागांचे १,२०० अधिकारी व कर्मचारी यांच्या शुक्रवारपर्यंत कोरोना चाचण्या करण्यात आल्यात. यात ३६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. हा एक प्रकारचा रॅण्डम सर्व्हे गृहीत धरल्यास सद्यस्थितीत सरासरी तीन टक्के नागरिक पॉझिटिव्ह आहेत व त्यांचा सर्वत्र मुक्त संचार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. असिम्टोमॅटिक असल्याने त्यांना लक्षणे जाणवत नाही व त्यांच्यापासून इतर नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ सकतो व यात कोमार्बिड रुग्णाला संसर्ग झाल्यास व त्यांनी अंगावर दुखणे काढल्यास अंगलट येणारी बाब ठरत आहे. जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून कोरोनाचा आलेख वाढायला लागला व फेब्रुवारी महिन्यात विस्फोट झाला. या काळात चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हिटी ही ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. आता कुठे यात घट व्हायला सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत चाचण्यांमध्ये ७, तर ९ टक्क्यांपर्यंत पॉझिटिव्हिटी आहे. चाचण्यांंमध्ये वाढ झालेली आहे. दोन हजारांपर्यंत होणाऱ्या चाचण्या आता सहा हजारांपर्यंत होत आहे. त्यामुळे रोज ४०० ते ५०० रुग्णांची नोंद होत आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा आलेख माघारत असतांना असिम्टोमॅटिक रुग्ण सुपरस्प्रेडर ठरू नयेत, यासाठी वेळी काळजी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महिनभरात वाढू शकतो संसर्ग, दक्षता महत्त्वाची
महिनाभरात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, असा अलर्ट जागतिक आरोग्य संघटनेद्वारा (डब्लूएचओ) द्वारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातदेखील सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे व आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
बॉक्स
ग्रामपंचायत निवडणुकीतही यंत्रणेत दोन टक्के पॉझिटिव्ह
जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक जानेवारी महिन्यात पार पडल्या. यावेळी प्रक्रियेतील ११ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ३०० वर अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यापूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुकीतही दोन टक्के नमुने पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दक्षता घेणे महत्त्वाचे आहे.
कोट
उद्योगधंदे, आस्थापनांमध्ये ८० टक्के लोकांच्या चाचण्या करण्यात आलेल्या आहे. परीक्षा प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काही अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. सर्वच विभागाला खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनीही पंचसूत्रीचे पालन करावे.
- शैलेश नवाल,
जिल्हाधिकारी
पाईंटर
जिल्ह्यात एकूण पाॅझिटिव्ह : ००००
आतापर्यंत मृत्यू : ०००००
सद्यस्थिती संक्रमणमुक्त : ००००
ॲक्टिव्ह रुग्ण :०००००