ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांची दुकानदारांपासून मुक्ती
By admin | Published: September 27, 2016 12:17 AM2016-09-27T00:17:46+5:302016-09-27T00:17:46+5:30
ठिबक सिंचन योजनेची अंमलबजावणी करताना ती बहुतांश दुकानदारांच्या भरवशावर अवलंबून होती.
६ आॅक्टोबरची ‘डेडलाईन’ : प्रधानमंत्री सिंचन योजना, आॅनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती : ठिबक सिंचन योजनेची अंमलबजावणी करताना ती बहुतांश दुकानदारांच्या भरवशावर अवलंबून होती. नव्या योजनेत स्वत: शेतकरी शासनाच्या वेबसाईटवर नोंदणी करून सहभागी होऊ शकतील, हा या योजनेमधील ठळक फरक आहे. या योजनेत नवीन शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. यासाठी ६ आॅक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ६६६.ेंँंँ१्र.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाईटवर ई-ठिबक या पोर्टलवर नोंदणी करायची आहे. नोंदणीनंतर सातबारा, बँक पासबुक व आठ अ च्या प्रती तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे जमा करून पूर्वसंमती घ्यावयाची आहे. त्यानंतर नोंदणी केलेल्या क्षेत्रानुसार ठिबक वा तुषार सिंचनाचा संच खरेदी करायचा आहे. योजनेसाठी पात्र कागदपत्रे लाभधारकाने सातबारा उतारा, आठ अ उतारा विहिरीवर वीज जोडणीचा दाखला, माती पाणी तपासणीचा दाखला, सातबाऱ्यावरील पीक नोंदीचा दाखला जोडावा.
नवीन सुविधा फायदेशीर
या आधी सूक्ष्म सिंचनाचे अनुदान मिळविण्यासाठी दुकानदारांवर अवलंबून राहावे लागत होते. परंतु या नव्या धोरणानुसार शेतकरी स्वत: वेबसाईटवर नाव नोंदणी करून योजनेचा फायदा घेऊ शकणार आहेत.
केंद्राचा वाटा घटला
याआधीच्या राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियान व योजनेसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात केंद्र शासनाच्या ८० टक्के तर राज्य सरकार २० टकके वाटा उचलत होता. मात्र आता अनुदानात केंद्र व राज्य शासनाचा ५०-५० टक्के राहील.
शेतकऱ्यांनी आॅनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी केलेल्या अर्जाची व त्यात नमूद केलेल्या कागदपत्रांची प्रत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ६ आॅक्टोबरच्या आत जमा करणे बंधनकारक आहे.
- दत्तात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी